IND Vs NZ, 4th T20I: Super Over मध्ये १४ पैकी १० धावा पहिल्या दोन चेंडूतच, पण नंतर...

India Vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेत आणखी एका Super Over सामन्यानं चाहत्यांना खिळवून ठेवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 05:08 PM2020-01-31T17:08:03+5:302020-01-31T17:08:33+5:30

whatsapp join usJoin us
India Vs New Zealand, 4th T20I: Another win in the Super Over, know how india win thrilling match | IND Vs NZ, 4th T20I: Super Over मध्ये १४ पैकी १० धावा पहिल्या दोन चेंडूतच, पण नंतर...

IND Vs NZ, 4th T20I: Super Over मध्ये १४ पैकी १० धावा पहिल्या दोन चेंडूतच, पण नंतर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेत आणखी एका Super Over सामन्यानं चाहत्यांना खिळवून ठेवलं. टीम इंडियाच्या हातून सामना गेल्यात जमा होता, त्यामुळे चाहते निराश होतेच. पण, कर्णधार विराट कोहली आणि अन्य खेळाडूंनी आशा सोडली नव्हती. तिसऱ्या सामन्यातील थरारनाट्यानंतर टीम इंडियाचे मनोबल चांगलेच उंचावलेले होते. त्यामुळे याही सामन्यात तसा चमत्कार घडू शकतो आणि तो घडवून आणण्याची ताकद आपल्यात आहे, हा विश्वास टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये होता. त्यांचा हा विश्वास खरा उतरला. टीम इंडियानं सलग दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला. 

भारतानं प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 165 धावा केल्या. मनीष पांडेचे नाबाद अर्धशतक आणि लोकेश राहुल व शार्दूल ठाकूरच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारतानं 165 धावांपर्यंत मजल मारली. पांडेने 36 चेंडूंत 3 चौकारांसह 50 धावा केल्या. लोकेशनं 39,तर शार्दूलनं 20 धावा केल्या. किवींच्या इश सोढीनं 26 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी अर्धशतकी खेळी केली. मुन्रोनं 47 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह 64 धावा केल्या, सेइफर्टनं 39 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 57 धावा केल्या. पण शार्दूल ठाकूरच्या अखेरच्या षटकानं सामना फिरवला अन् सुपर ओव्हरमध्ये गेला.

अखेरच्या षटकातील नाट्य
पहिला चेंडू - रॉस टेलर ( 24) झेलबाद
दुसरा चेंडू - डॅरील मिचेलनं चौकार मारला
तिसरा चेंडू - टीम सेइफर्ट धावबाद
चौथा चेंडू - एक धाव
पाचवा चेंडू - मिचेल झेलबाद
सहवा चेंडू - सँटनर धावबाद

सुपर ओव्हरचा थरार...
टीम सेइफर्ट आणि कॉलीन मुन्रो फलंदाजीला आले. जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यरनं झेल सोडला.. त्यावर दोन धावा घेत सेइफर्टनं चौकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा सेइफर्टचा झेल लोकेश राहुलकडून सुटला. पण, चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टनं सुंदरनं त्याला झेलबाद केले. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत किवींनी भारतासमोर विजयासाठी 14 धावांचे लक्ष्य ठेवले.

भारताकडून विराट कोहली अन् लोकेश राहुल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरले. टीम साउदीच्या पहिल्याच चेंडूवर लोकेशनं षटकार खेचला, दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचून त्यानं धावांचं अन् चेंडूंमधील अंतर कमी केलं. टीम इंडियाला चार चेंडूवर चार धावा हव्या होत्या. पण, तिसऱ्या चेंडूवर लोकेश झेलबाद झाला. कोहलीनं चौथ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियानं बाजी मारली.

Super Over : टीम इंडियाचा Super विजय, शार्दूल ठाकूरनं फिरवला सामना 

 रिषभ पंत अन् संजू सॅमसन अपयशी, चाहत्यांची धोनीला साद; घ्या पुरावा

टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह 'हरवलाय'?

नाणेफेकीपूर्वीच कर्णधाराची माघार, खांद्याला झाली गंभीर दुखापत

रिषभ पंत अन् संजू सॅमसन अपयशी, चाहत्यांची धोनीला साद; घ्या पुरावा

Web Title: India Vs New Zealand, 4th T20I: Another win in the Super Over, know how india win thrilling match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.