Join us  

India vs New Zealand, 2nd Test : पत्रकाराच्या प्रश्नावर भडकला विराट कोहली; म्हणाला...

India vs New Zealand : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यावर समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्याला कसोटी मालिकेत केवळ 38 धावा करता आल्या आणि भारताच्या पराभवामागचं हे एक प्रमुख कारण आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 12:31 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यावर समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्याला कसोटी मालिकेत केवळ 38 धावा करता आल्या आणि भारताच्या पराभवामागचं हे एक प्रमुख कारण आहे. टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करावी लागली. न्यूझीलंडने 7 विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यात 11 डावांमध्ये केवळ 218 धावा करता आल्या. या मालिकेत भारताकडून सर्वात कमी धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान त्याला मिळाला.  

सामना जिंकण्यासाठी टीम इंडियानं खेळला होता रडीचा डाव, अंपायरनी दिली ताकीद अन्...

कालच्या 6 बाद 90 धावांवरून आजचा खेळ सुरू करणारा भारतीय संघ 124 धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 132 धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांना खिंड लढवायची होती, परंतु तेही अपयशी ठरले. भारताच्या तळाच्या चार फलंदाजांना तिसऱ्या दिवशी केवळ 34 धावा जोडता आल्या.  न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना शतकी भागीदारी केली. लॅथम आणि ब्लंडल यांनी अनुक्रमे 52 आणि 55 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 7 विकेट्स राखून विजय मिळवला.

या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार कोहली पत्रकारावर चांगलाच भडकला. या सामन्यात कोहलीच्या आक्रमकतेचीही चर्चा रंगली. केन विलियम्सन बाद झाल्यानंतर कोहलीनं ज्या पद्धतीनं प्रेक्षकांकडे पाहून अपशब्द वापरले आणि जल्लोष केला, त्यावर टीका झाली. पत्रकाराने त्याबाबत कोहलीला प्रश्न विचारला.

  • पत्रकार - केन विलियम्सन बाद झाल्यानंतर त्याला आणि प्रेक्षकांना डिवचण्याच्या तुझ्या कृतीबाबत तू काय सांगशील? एक कर्णधार म्हणून तुला एक आदर्श ठेवायला हवा, असं वाटत नाही का?
  • कोहली - तुम्हाला काय वाटतं?  
  • पत्रकार - मी तुला प्रश्न विचारला आहे? 
  • कोहली - मैदानावर नेमकं काय घडलं हे तू जाणून घ्यायला हवं आणि त्यानंतर प्रश्न विचारायला हवा. त्रोटक माहीती घेऊन मला प्रश्न विचारणे चुकीचे आहे. आणि हो तुला विवाद निर्माण करायचा आहे, तर ही योग्य जागा नाही. मी मॅच रेफरींसोबत चर्चा केली, त्यांना या प्रकरणात काहीच चुकीचे वाटले नाही. धन्यवाद.

2018च्या इंग्लंड दौऱ्यातही 4-1 अशा फरकाने भारताला पराभव पत्करावा लागला होता आणि त्याहीवेळेस कोहलीचा पारा चढला होता. 

टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!

मालिकेतील अपयशानंतर विराट कोहली म्हणतो; सर्वोत्तम संघाकडून पराभूत झाल्याची खंत नाही, पण... 

ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंड, पाकिस्तानला मागे टाकून न्यूझीलंडची आगेकूच

न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली

टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहली