टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!

न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका निर्विवादपणे जिंकून टीम इंडियानं धमाकाच उडवला. पण, त्यानंतर झालेल्या वन डे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला सपशेल अपयश आलं.

न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका निर्विवादपणे जिंकून टीम इंडियानं धमाकाच उडवला. पण, त्यानंतर झालेल्या वन डे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला सपशेल अपयश आलं.

कसोटी मालिकेत तर टीम इंडियाला चार डावांमध्ये 250 धावांचा पल्लाही ओलांडता आला नाही. त्यापैकी तीन डावांत ( 165, 191, 242 आणि 124) टीम इंडिया दोनशे धावांच्या आत तंबूत परतली.

रोहित शर्मा आणि शिखर धवन या नियमित सलामीवीरांची अनुपस्थिती ही संघासाठी चिंता होती. पण, त्यांना पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल आणि शुबमन गिल हे पर्याय होते. त्यापैकी योग्य निवड करणे गरजेचे होते.

मयांकची निवड ही अपेक्षित होतीच. पृथ्वी किंवा शुबमन यांच्यापैकी एक पर्याय निवडायचा होता. शुबमननं भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात दमदार कामगिरी करून त्याचा दावा सक्षम केला, पण पृथ्वीची लॉटरी लागली.

पृथ्वी आणि मयांक यांना साजेशी सुरुवात करून देता आली नाही. त्यात मधल्या फळीनेही अपयशाचा पाढा गिरवला. पृथ्वी आणि मयांक यांना अनुक्रमे केवळ 98 आणि 102 धावाच करता आल्या.

मधल्या फळीतील सर्वात भरवशाचा फलंदाज विराट कोहलीही या मालिकेत सपशेल अपयशी ठरला. त्याला चार डावांमध्ये केवळ 38 धावाच करता आल्या.

चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाजांना किवी गोलंदाजांच्या रणनीतीवर मात करता आली नाही. दोघांनी अनुक्रे 100 आणि 91 धावा केल्या.

बराच काळ बाकावर बसून राहिलेल्या रिषभ पंतला या मालिकेतून आपले दमदार पुनरागमन करण्याची संधी होती. पण, न्यूझीलंडच्या बाऊंसरसमोर त्याचाही निभाव लागला नाही.

हनुमा विहारीने संयमीपणा दाखवला, परंतु तोही मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला.

एकीकडे न्यूझीलंडचे गोलंदाज आग ओकत असताना भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली.

इशांत शर्माला झालेली दुखापत ही संघाची डोकेदुखी वाढवणारी ठरली. इशांतने एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या.

जगातील सर्वात घातकी गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून अजूनही नीट सावरलेला नाही. त्यामुळे त्याला खेळवण्याची घाई टीम इंडियाला महागात पडली. बुमराहला दोन सामन्यांत केवळ 6 विकेट घेता आल्या.