Join us  

India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ; दोन खेळाडूंना मिळू शकते संधी

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभावित संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 4:27 PM

Open in App
ठळक मुद्देभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. हा कसोटी सामना भारताने जिंकला नाही तर त्यांना ही मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ नेमका कसा असेल, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन खेळाडूंना संधी मिळेल, असे म्हटले जात आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभावित संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. शास्त्री यांनी सांगितल्यानुसार भारतीय संघात या सामन्यासाठी उमेश यादवची निवड करण्यात येऊ शकते. कारण भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे इशांतच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादव त्याची जागा घेऊ शकतो.

या सामन्याच्या सराव सत्रामध्ये भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला दुखापत झाली होती. पण शास्त्री यांनी तो या सामन्यासाठी फिट असल्याचे सांगितले आहे. पण आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये कोणाला संघात स्थान मिळेल, याबाबत चांगलीच चर्चा रंगत आहे. पण शास्त्री यांनी दिलेल्या संकेतांनुसार या सामन्यासाठी जडेजाला संधी मिळू शकते. त्यामुळे या सामन्यात अश्विनला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. मात्र सामन्याच्या ऐन पूर्वसंध्येला भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने तो दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, इशांतच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला भारतीय संघात स्थान मिळू शकते.

रणजी करंडक स्पर्धेत खेळताना  इशांत शर्माच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून सावरत तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला होता. तसेच त्याने पहिल्या कसोटीत भेदक गोलंदाजी करत पाच बळीही टिपले होते. मात्र भारतीय संघासाठी मालिकेत  करो वा मरो ची स्थिती असतानाच इशांतच्या उजव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीने डोके वर काढले आहे.

आज भारतीय संघाच्या सरावसत्रास इशांत अनुपस्थित होता. गुरुवारी सराव केल्यानंतर इशांतच्या पायाला वेदना जाणवू लागल्या होत्या. त्याने याबाबतची कल्पना संघव्यवस्थापनाला दिली होती. त्यानंतर इशांतला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही.

इशांतला झालेल्या दुखापतीपूर्वी सलामीवीर पृथ्वी शॉ हा सुद्धा जायबंदी झाल्याचे वृत्त आले होते. पृथ्वी शॉने गुरुवारी सराव सत्रातून माघार घेतली होती. त्याच्या डाव्या पायाला सूज आल्याने त्याने हा निर्णय घेतला आणि त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे. त्यात तो तंदुरुस्त नसल्याचे आढळल्यास टीम इंडियात शुभमन गिल पदार्पण करू शकतो. पृथ्वीला पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून ३० धावा करता आल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडइशांत शर्मारवींद्र जडेजाआर अश्विनपृथ्वी शॉ