Join us  

India vs New Zealand, 2nd Test : भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत रवी शास्त्री यांनी केला मोठा खुलासा

या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे नेमके होणरा तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत शास्त्री यांनी मात्र मोठा खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 5:39 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे नेमके होणरा तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत शास्त्री यांनी मात्र मोठा खुलासा केला आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. हा कसोटी सामना भारताने जिंकला नाही तर त्यांना ही मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ नेमका कसा असेल, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन खेळाडूंना संधी मिळेल, असे म्हटले जात आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभावित संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. 

दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. यापूर्वी झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत इशांतला दुखापत झाली होती. त्यामुळे इशांतला काही सामन्यांना मुकावे लागले होते. पण आता या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. इशांतच्या जागी संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इशांतबरोबरच भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाला आहे. पृथ्वी शॉने गुरुवारी सराव सत्रातून माघार घेतली होती. त्याच्या डाव्या पायाला सूज आल्याने त्याने हा निर्णय घेतला आणि त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. पृथ्वीबाबत शास्त्री यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

पृथ्वी हा पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे मयांक अगरवालबरोबर पृथ्वी सलामीला येणार आहे. याबाबतचा खुलासा शास्त्री यांनी केला होता. त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही याबाबतचे संकेत दिले होते.

टॅग्स :रवी शास्त्रीपृथ्वी शॉभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहली