माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी भागीदारी करून भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 'हिटमॅन' रोहित व 'गब्बर' शिखर यांनी तो निर्णय सार्थ ठरवताना पहिल्या विकेटसाठी शतकी धावा केल्या. त्यांच्या या भागीदारीने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडला.
नेपियर वन डे सामना सहज खिशात घातल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मोठ्या आत्मविश्वासाने ते मैदानावर उतरले. रोहित, शिखरच्या खेळीतून तो प्रकर्षाने जाणवतही होता. दोघांनी अर्धशतक झळकावत शतकी भागीदारी केली. रोहितने षटकार खेचून कारकिर्दीतले 38 वे अर्धशतक झळकावले. त्यापाठोपाठ शिखरनेही 27वे अर्धशतक झळकावले. रोहित व शिखरची ही 14 वी शतकी भागीदारी ठरली. यासह या दोघांनी भारताकडून सर्वाधिक शकती भागीदारी करणाऱ्या जोडींमध्ये चौथे स्थान पटकावले. त्यांनी तेंडुलकर व सेहवाग यांचा 13 शतकी भागीदारींचा विक्रम मोडला.
सलामीवीरांच्या शतकी भागीदारीत रोहित व शिखर चौथ्या क्रमांकावर आहेत. या विक्रमात