माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : फलंदाजीत नाबाद 48 धावांचं योगदान देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा एकदा आपल्या यष्टिमागील कौशल्याने सर्वांना थक्क केले. माजी कर्णधार धोनी यष्टिमागून भारतीय गोलंदाजांना मार्गदर्शन करत होताच. त्याचबरोबर त्याने महत्त्वाचा फलंदाज रॉस टेलरची घेतलेली विकेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल ठरली.
भारताच्या 324 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलदाजांनी पुन्हा शरणागती पत्करली. मात्र, रॉस टेलर एका बाजूने खिंड लढवत होता. त्याला बाद करण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजीत बदल करून पाहिले. मात्र, धोनी आणि केदार जाधव या जोडीने भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्याच्या या सुपरडुपर स्टम्पिंगला तोड नव्हती.
पाहा व्हिडीओ...