वेलिंग्टन, भारत विरुद्घ न्यूझीलंड : कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी करताना किवींना दमदार सलामी दिली. मात्र, कृणाल पांड्याने ही जोडी फोडली. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सननेही जोरदार फटकेबाजी केली. या सामन्यात दिनेश कार्तिकने दोन सोपे झेल सोडले, परंतु त्याच्या एका झेलने सर्वांचा राग शांत केला.
कार्तिकने या सामन्यात दोन सोपे झेल सोडले, परंतु 15 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने स्टनिंग कॅच घेतला. डॅरिल मिचेलनो टोलावलेला चेंडू सीमारेषेपार जाईल असे वाटत होते, परंतु त्याचवेळी कार्तिकने हवेत झेपात तो चेंडू सीमारेषेच्या आत ढकलला आणि त्वरीत आत येऊन तो टिपला. तिसऱ्या पंचांनी मिचेलला बाद दिले.
पाहा व्हिडीओ...