Join us  

India vs England: ' या ' त्रिकुटाला पाचव्या कसोटीत संधी मिळणार का?

कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत भारतीय संभाव्य कसोटी संघातील काही खेळाडूंना अजून खेळवलेले नाही, ते या दौऱ्यात पर्यटक म्हणूनच आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 1:23 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघासमोर पृथ्वीसारखा पर्याय खुला आहे. पृथ्वीने आतापर्यंत युवा संघातून खेळताना दमदार कामगिरी केली आहे.

मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला आज सुरुवात होणार आहे. भारताने ही मालिका 1-3 अशी गमावली आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला प्रयोग करण्याची मुभा आहे. त्यामुळे  ' या ' त्रिकुटाला पाचव्या कसोटीत संधी मिळणार का? असा सवाल चाहते विचारत आहेत.

कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत भारतीय संभाव्य कसोटी संघातील काही खेळाडूंना अजून खेळवलेले नाही, ते या दौऱ्यात पर्यटक म्हणूनच आहेत. यामध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि करुण नायर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारताच्या संभाव्य संघात मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या त्रिकुटाला या सामन्या संधी देण्यात येऊ शकते.

भारताच्या एकाही सलामीवीराला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचवेळी भारतीय संघासमोर पृथ्वीसारखा पर्याय खुला आहे. पृथ्वीने आतापर्यंत युवा संघातून खेळताना दमदार कामगिरी केली आहे. मुंबईकडून खेळतानाही त्याने धावांची लूट केली आहे. त्यामुळे त्याला या सामन्यात संधी मिळायला हवी, असे चाहत्यांना वाटत आहे.

जडेजा हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. सध्याच्या घडीला आर. अश्विन हा जायबंदी आहे आणि त्याला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सामन्यात जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारताचा त्रिशतकवीर फलंदाज करुण नायर असूनही बेंचवर बसून आहे. संघाला गरज असेल तर तो सलामीला खेळू शकतो, त्याचबरोबर मधल्या फळीतही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचाही विचार या सामन्यासाठी व्हायला हवा, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीपृथ्वी शॉरवींद्र जडेजा