Join us  

India vs England :  Mauka bhi hai, dastoor bhi hai!; रिषभ पंत स्टम्पमागून आर अश्विनला खुणवत होता, जॉनी बेअरस्टोला डिवचत होता, Video   

या सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) यष्टिंमागून मस्ती करताना दिसला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 9:57 PM

Open in App

India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: मोहम्मद शमी (Mohammed Shami) वगळता सराव सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. शमीनं ३ विकेट्स घेतल्या, परंतु त्याच्याही चौथ्या षटकात इंग्लंडच्या फलंदाजांनी धावा कुटल्या. जसप्रीत बुमराहनं टिच्चून मारा केला, पण भुवनेश्वर कुमारनं ४ षटकांत ५४ धावा दिल्या. त्यात आर अश्विनचा फॉर्म व हार्दिक पांड्याची तंदुरुस्ती हे चिंतेचे विषय टीम इंडियासमोर आहेतच. दरम्यान आजच्या सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) यष्टिंमागून मस्ती करताना दिसला. 

आर अश्विन गोलंदाजी करत असताना स्ट्राईकवर जॉनी बेअरस्टो होता आणि तेव्हा पंत म्हणाला, "अरमान पुरा करने का यही मौका है.  लेग स्पिन करने का. मौका भी है, दस्तूर भी है!''

पाहा व्हिडीओ... जेसन रॉय व कर्णधार जोस बटलर ( इयॉन मॉर्गनला विश्रांती) यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या. शमीनं चौथ्या षटकात बटलरचा ( १८) त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात जेसन रॉय ( १७) याचीही विकेट शमीनं काढली. आयसीसी क्रमवारीत अव्वल फलंदाज डेव्हिड मलान ( १८) याला राहुल चहरनं माघारी पाठवलं. त्यांतर जॉनी बेअरस्टो व लाएम लिव्हिंगस्टोन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या. पुन्हा एका शमीच धावून आला आणि त्यानं लिव्हिंगस्टोनचा ( ३०) अडथळा दूर केला. 

पण, शमीच्या अखेरच्या षटकात मोईन अलीनं खोऱ्यानं धावा काढल्या. शमीनं ४ षटकांत ४० धावांत ३ विकेट्स घेतल्या. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार मोईन अली आज भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना  दिसला. १९व्या षटकात जसप्रीत बुमराहनं अप्रतिम यॉर्कर टाकून ४९ धावा करणाऱ्या बेअरस्टोचा त्रिफळा उडवला. बुमराहनं ४ षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली. मोईन अलीनं २० चेंडूंत नाबाद ४३ धावा कुटल्या. भुवनेश्वर कुमारनं टाकलेल्या २० व्या षटकात इंग्लंडनं २१ धावा जोडून ५ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१रिषभ पंतआर अश्विनभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App