आयपीएलचे कोट्यवधी रुपये का नाकारले? इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटनं सांगितलं कारण, केलं मोठं विधान

IPL 2021, Joe Root : आयपीएलमध्ये न खेळण्याचा इंग्लंडच्या कर्णधाराचा निर्णय, काय आहे यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 07:22 PM2021-02-12T19:22:25+5:302021-02-12T19:23:28+5:30

whatsapp join usJoin us
india vs england test why joe root will not play in IPL 2021 he gives the reasons | आयपीएलचे कोट्यवधी रुपये का नाकारले? इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटनं सांगितलं कारण, केलं मोठं विधान

आयपीएलचे कोट्यवधी रुपये का नाकारले? इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटनं सांगितलं कारण, केलं मोठं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट (Joe Root) याने कसोटी क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडलेली असली तरी त्यानं आयपीएलमध्येही (IPL) खेळावं असं क्रिकेट चाहते म्हणत आहेत. पण ज्यो रुटनं यंदा जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणून ओळख असलेल्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रुटनं सलग तिसऱ्यांदा असा निर्णय घेतलाय. यामागचं नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. त्यावर त्यानं उत्तर दिलंय. (Joe Root Will Not Play In IPL 2021)

आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात एकूण २९२ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. ज्यो रुटचे सहकारी मोईल अली, जेसन रॉय आणि मार्क वूड यांचीही नावं यात समाविष्ट आहेत. पण ज्यो रूटनं आयपीएल न खेळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेणं अतिशय कठीण होतं. पण देशाच्या व्यग्र क्रिकेट वेळापत्रकामुळे याबाबतचा निर्णय घ्यावा लागल्याचं ज्यो रुटनं म्हटलं आहे. 

आयपीएलसाठी उत्सुक होता ज्यो रूट
"आयपीएलच्या एका मोसमात तरी खेळता यावं यासाठी मी खूप उत्सुक आहे. पण यावेळीही मला आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेणं अतिशय कठीण गेलं. पुढील मोसमात मला खेळता येऊ शकेल अशी आशा आहे", असं ज्यो रुट म्हणाला. इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तब्बल २२७ धावांनी दमदार विजय प्राप्त केला. या सामन्यात ज्यो रुटने २१८ धावांची खणखणीत खेळी साकारली होती. 

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता १-० ने आघाडीवर आहे. महत्वाची बाब म्हणजे इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानात १८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी इंग्लंडचा संघ देखील दावेदार समजला जातोय. त्यामुळे या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ज्यो रुटने येत्या काळात केवळ इंग्लंडसाठीच्या आगामी कसोटी मालिका खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 

इंग्लंडचा संघ यंदाच्या वर्षात न्यूझीलंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर अॅशेस मालिकेसाठी संघ ऑस्ट्रेलियासाठी देखील रवाना होणार आहे. त्याआधी इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

"यंदाच्या वर्षात ज्या पद्धतीनं आम्हाला कसोटी सामने खेळायचे आहेत ते पाहता यंदाही आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेणं मला योग्य वाटत आहे. इंग्लंडला याचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही. आयपीएल न खेळण्याचा निर्णय माझ्यासाठी अतिशय कठीण होता. पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याची किंवा किमान लिलाव प्रक्रियेत सामील होण्याची संधी मिळेल अशी आशा व्यक्त करतो", असं ज्यो रुट म्हणाला. 
 

Web Title: india vs england test why joe root will not play in IPL 2021 he gives the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.