ओव्हल, भारत वि. इंग्लंडः इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका संस्मरणीय राहील. त्याने पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताचा अखेरचा खेळाडू मोहम्मद शमीला बाद केले आणि विक्रमाला गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो वेगवान गोलंदाज ठरला. अँडरसनचा कसोटी क्रिकेटमधील तो 564वा बळी ठरला आणि याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राचा ( 563) विक्रम मोडला. इंग्लंडने ही मालिका 4-1 अशी जिंकली.
(अॅलिस्टर कुकला इंग्लंडचा विजयी निरोप, टीम इंडियाचा 118 धावांनी पराभव)
(
India vs England Test: भारतीय संघ म्हणजे बडा घर पोकळ वासा... )
सामन्याचा चौथ्या दिवशी अँडरसनने चेतेश्वर पुजाराला बाद करून मॅक्ग्राच्या विक्रमाची बरोबरी केली होती. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अँडरसन चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या कसोटीत अँडरसनने ( 2 व 3) दोन्ही डावांत मिळून एकूण 5 विकेट घेतल्या.
सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 800 विकेटसह अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न ( 708) आणि भारताचा अनिल कुंबळे ( 619) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. भारताविरुद्ध सर्वाधिक 110 विकेट घेण्याचा विक्रमही अँडरसनच्या नावावर आहे.