Join us  

India vs England Test : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर; काय आहेत डावपेच?

India vs England Test: इंग्लंड आणि भारत कसोटी मालिकेत यजमानांनी पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व गाजवले. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने भारतीय दिग्गजांना चीतपट करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 10:18 AM

Open in App

लंडन - इंग्लंड आणि भारत कसोटी मालिकेत यजमानांनी पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व गाजवले. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने भारतीय दिग्गजांना चीतपट करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अवघ्या तीन दिवसांत इंग्लंडने भारताचा चांगलाच पाहुणचार केला आणि एक डाव व 159 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या खेळाडूंनी तिन्ही आघाडींवर हुकुमत गाजवली आणि भारताचा दोन्ही डाव एकूण 90 षटकांच्या आतच गुंडाळला. 

( India vs England Test: तिसऱ्या कसोटी सामन्यालाही बेन स्टोक्स मुकण्याची शक्यता )

तिसरी कसोटी लढत येत्या शनिवारपासून नॉटिंगहॅमवर होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने १३ सदस्यीय संघ जाहीर केला. पहिल्या कसोटीतील विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्सवर कोर्टात सुनावणी सुरू असल्याने त्याचा या संघात समावेश नाही. मात्र इंग्लंड संघाने भारतीय संघाला पुन्हा नमवण्यासाठी कंबर कसली आहे. 

( कोहली, शास्त्रीचे अधिकार कमी होणार? )

जो रूट आपल्या नेतृत्वकौशल्याने भारतीय संघावर दडपण राखण्याची रणनीती आखत आहे. तिसऱ्या कसोटीतील खेळपट्टीचा अंदाज घेऊन जेमी पॉर्टर आणि मोईन अली यांना अंतिम अकरात खेळवण्याचा निर्णय घेतला जाईल. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी सर्वच्या सर्व सामने खेळणे शक्य नसल्याचे आधीच स्पष्ट केल्याने तिसऱ्या कसोटीत त्यांना कदाचित विश्रांती मिळू शकते. ख्रिस वोक्स आणि ऑली पोप यांची जागा निश्चित मानली जात आहे. त्यामुळे इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत कोणताही बदल न करता तेच १३ खेळाडू कायम राखले आहेत. केवळ अंतिम अकरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.  

इंग्लंडचा संघ : जो रूट, मोइन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, ॲलेस्टर कुक, सॅम कुरन, किटन जेनिंग, ऑली पॉप, जेमी पॉर्टर, आदिल रशीद, ख्रिस वोक्स. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटइंग्लंडजो रूटक्रीडा