Join us  

India vs England Test: संगकाराला पिछाडीवर टाकत कुक पाचव्या स्थानी

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुकने पाचवा क्रमांक पटकावला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 7:19 PM

Open in App
ठळक मुद्देया यादीमध्ये भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी विराजमान आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : आपल्या अखेरच्या सामन्यात शतक झळकावत इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुकने एक अनोख विक्रम केला आहे. पण या शतकाबरोबरच त्याने श्रीलंकेचा माजी महान फलंदाज कुमार संगकाराला मागे टाकले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुकने पाचवा क्रमांक पटकावला आहे. या यादीमध्ये भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी विराजमान आहे. सचिनच्या खात्यामध्ये 15, 921 धावा आहेत. सचिननंतर अनुक्रमे रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांचा या यादीत समावेश आहे. कुकने या यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे.

टॅग्स :अॅलिस्टर कुकभारत विरुद्ध इंग्लंड