Join us  

India vs England Test 2018: ... तर कोहली क्रमवारीत होऊ शकतो अव्वल फलंदाज

स्मिथ आणि कोहली यांच्यामध्ये सध्याच्या घडीला 26 गुणांचा फरक आहे. त्यामुळे कोहलीने जर या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली तर त्याला अव्वल स्थानावर पोहोचण्याची नामी संधी असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 6:22 PM

Open in App
ठळक मुद्देगेल्या दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांमध्ये कोहलीला फक्त 134 धावाच करता आल्या होत्या.

दुबई : इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी कशी होते, याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या मालिकेत जर कोहलीने लौकिकाला साजेशी फलंदाजी करत धावांचे इमले रचले तर त्याला क्रमवारीत अव्वल स्थान पटकावता येऊ शकते.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा निलंबित कर्णधार स्टीव्हन स्मिथ आहे. चेंडूशी छेडछाडकेल्याप्रकरणी स्मिथ वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही. स्मिथ आणि कोहली यांच्यामध्ये सध्याच्या घडीला 26 गुणांचा फरक आहे. त्यामुळे कोहलीने जर या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली तर त्याला अव्वल स्थानावर पोहोचण्याची नामी संधी असेल.

इंग्लंडच्या गेल्या दौऱ्यात कोहलीला चांगली कामगिरी करता आली नव्हती. गेल्या दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांमध्ये कोहलीला फक्त 134 धावाच करता आल्या होत्या. त्याचबरोबर कोहली पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व करत आहे. त्यामुळे या मालिकेत कोहलीची फलंदाजी आणि कप्तानीची खरी परिक्षा असणार आहे.

कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड