Join us  

India vs England : भारतीय खेळाडूंच्या वागण्यावर इंग्लंडचे काही खेळाडू नाराज, आयपीएलमधून माघार घेण्याच्या तयारीत?

चौथ्या कसोटीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् भरत अरूण व आर श्रीधर यांनाही विलगीकरणात जावे लागले. त्यात पाचव्या कसोटीच्या आदल्या दिवशी आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हा सामना रद्द करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:35 AM

Open in App

India vs England : भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पाचवी कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. मँचेस्टर कसोटी रद्द करावी लागल्यानं इंग्लंडचे क्रिकेटपटू नाराज झाले आहेत आणि त्यातील काही खेळाडू तर प्रचंड संतापले आहेत. The Sun ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय खेळाडूंनी कोरोना नियमाशी खेळ केला आणि पाचव्या कसोटीच्या आदल्या दिवसापर्यंत हे खेळाडू मँचेस्टरमध्ये भ्रंमती करत होते. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू संतापले आहेत आणि एका क्रिकेटपटूनं तर आयपीएल २०२१मधून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.

इंग्लंडच्या कसोट संघातील जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, मोईन अली, डेवीड मलान आणि ख्रिस वोक्स हे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) खेळणार आहेत. पण The Sun च्या वृत्तानुसार यापैकी एक खेळाडू आयपीएलमधून माघार घेण्याचा विचार करत आहे.  बेअरस्टो हा सनरायझर्स हैदराबाद, सॅम कुरन व मोईन अली चेन्नई सुपर किंग्स, डेवीड मलान हा पंजाब किंग्स व ख्रिस वोक्स हा दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य आहे.  पण, जर वृत्त खरं असेल तर यापैकी एक जण माघार घेईल. हे सर्व खेळाडू भारतीय खेळाडूंसोबत लंडनहून यूएईत चार्टर्ड फ्लाईटनं दाखल होतील. पाचवी कसोटी रद्द झाल्यामुळे हे आता ठरलेल्या वेळेच्या आधीच यूएईसाठी रवाना होतील.

इंग्लंडचे खेळाडू का रागावलेत?( Why some England cricketers are angry and furious with India?) 

  • पाचव्या कसोटीच्या आदल्या दिवशी भारतीय खेळाडू मँचेस्टरच्या रस्त्यांवर भटकंती करत होते आणि त्यातूनच त्यांचा कोरोना नियमांबद्दलचे नाटक उघडे पडले, असा दावा वृत्तात केला गेला आहे.  
  • काही भारतीय खेळाडू मँचेस्टर येथील मोठ्या स्टोअरमध्ये दिसले, तर काही खेळाडूंनी फोटोशूटला हजेरी लावली होती.  
  • सर्व भारतीय खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होतो, तरीही त्यांनी शुक्रवारी मैदानावर उतरण्यास नकार दिला.  
  • रवी शास्त्री यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लावलेल्या हजेरीमुळे इंग्लंडचे खेळाडू आधीच नाराज होते आणि ही अविवेकी वागणुक असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले.  

 

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंची यादी( List & Status of England Cricketers in IPL 2021)

  • जोस बटलर ( राजस्थान रॉयल्स) ४.४ कोटी - मुलाच्या जन्मासाठी त्यानं आधीच आयपीएलमधून माघार घेतली आहे
  • जोफ्रा आर्चर ( राजस्थान रॉयल्स) ७.२ कोटी - दुखापतीमुळे घेतलीय माघार
  • बेन स्टोक्स  ( राजस्थान रॉयल्स) १२.५ कोटी - मानसिक आरोग्याच्या कारणास्तव माघार
  • लाएम लिव्हिंगस्टोन ( राजस्थान रॉयल्स) ७५ लाख - दुखापतग्रस्त आणि सहभागावर अनिश्चितता
  •  इयॉन मॉर्गन ( कोलकाता - ५.२५ कोटी), सॅम कुरन ( चेन्नई -५.५ कोटी), मोईन अली ( चेन्नई - ७ कोटी), जॉनी बेअरस्टो ( हैदराबाद -  २.२ कोटी), टॉम कुरन ( दिल्ली - ५.५ कोटी), सॅम बिलिंग ( दिल्ली - २ कोटी), ख्रिस वोक्स ( दिल्ली - १.५ कोटी), ख्रिस जॉर्डन ( पंजाब ३ कोटी), डेवीड मलान ( पंजाब १.५ कोटी), जेसन रॉय ( हैदराबाद - २ कोटी). 
टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवी शास्त्रीआयपीएल २०२१
Open in App