Mohammed Shami Eyes On Big World Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. वनडे मालिकेआधी मोहम्मद शमीनं अखेरच्या टी-२० सामन्यात आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकदम फिट असल्याचे दाखवून देण्यासाठी तो वनडे मालिकेसाठी मैदानात उतरेल. या मालिकेत मोहम्मद शमीला विक्रमी डाव साधण्याची संधी आहे. जाणून घेऊयात त्याला खुणावणाऱ्या खास विक्रमासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शमीकडे जलद 'द्विशतकी' डाव साधण्याची संधी, पण..
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मोहम्मद शमीला मोठा विक्रम सेट करण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्याला कामगिरीही अगदी सर्वोत्तम दर्जाची करावी लागेल. भारतीय जलदगती गोलंदाजानं आतापर्यंत १०१ वनडे सामन्यातील १०० डावात १९५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. जर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या तर वनडेत सर्वात जलद २०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो टॉपला येईल.
मिचेल स्टार्कच्या नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड
सध्याच्या घडीला वनडेत सर्वात जलद २०० विकेट्स घेण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावे आहे. त्याने १०२ सामन्यात हा पल्ला गाठला होता. शमीनं पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेत २०० विकेट्सचा डाव साधला तर तोही १०२ डावात २०० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. पण एक डाव कमी खेळून शमी इथपर्यंत पोहचेल. त्यामुळे हा वर्ल्ड रेकॉर्ड शमीच्या नावे होईल.
वनडेत जलद २०० विकेट्स घेणारे गोलंदाज
वनडेत सर्वात जलद २०० विकेट्सचा पल्ला गाठणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १०४ सामन्यात द्विशतकी डाव साधला होता. न्यूझीलंडच्या ट्रेंड बोल्टनं १०७ सामन्यात हा टप्पा पार केला होता. त्यापाठोपाठ या यादीत ब्रेटलीचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाच्या या माजी गोलंदाजानं ११२ सामन्यात २०० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.
Web Title: India vs England ODI Series Mohammed Shami Eyes On Break Mitchell Starc Fastest 200 ODI Wickets World Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.