Join us  

India Vs England, Latest News : मोहम्मद शमीची अशी ही अनोखी हॅट्रिक, पाहा नेमकं काय घडलंय

शमीने सफल गोलंदाजीचीही हॅट्ट्रीक केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 8:28 PM

Open in App

ललित झांबरे, आयसीसी वर्ल्ड कप 2019मोहम्मद शमीने आज इंग्लंडचा निम्मा संघ बाद करताना त्याने सलग तिसºया सामन्यात चार किंवा अधिक बळी मिळवले आहेत.यासह त्याने सफल गोलंदाजीचीही हॅट्ट्रीक केली आहे. 

 अशी सलग कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय आणि विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातीलही तो केवळ दुसराच गोलंदाज आहे. त्याच्याआधी भारतातर्फे १९८८ मध्ये लेगस्पिनर नरेंद्र हिरवाणीने सलग तीन सामन्यात  चार बळी मिळवले होते तर विश्वचषक स्पर्धेत शमीच्या आधी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने २०११ मध्ये सलग तीन सामन्यात चार किंवा अधिक गडी बाद केले होते.नरेंद्र हिरवाणी (१९८८)४/४३    वि. न्यूझीलंड      शारजा४/४६    वि. न्यूझीलंड      शारजा४/५०    वि. न्यूझीलंड      शारजाशाहिद आफ्रिदी (विश्वचषक २०११)५/१६     वि. केनिया       हंबनटोता६/३४     वि.श्रीलंका       कोलंबो५/२३     वि. कॅनडा         कोलंबोमोहम्मद शमी (विश्वचषक २०१९)४/४०    वि. अफगणिस्तान   साऊदम्प्टन४/१६    वि. वेस्ट इंडिज       मँचेस्टर५/६९    वि. इंग्लंड             बर्मिंघम

आतापर्यंत भारताच्या गोलंदाजांना जे जमले नव्हते ते भारताचा वेगवान गोलंदाज मोहमम्द शमीने यंदाच्या विश्वचषकात करून दाखवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तर शमीने पाच फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला. पण विश्वचषकात पाच बळी मिळवारा तो सहावा गोलंदाज ठरला. त्याने जो इतिहास रचला आहे, तो यापेक्षा वेगळा आहे.

या सामन्यात शमीने पाच बळी मिळवत शमीने इतिहास रचला आहे. विश्वचषकात एकाच डावात पाच बळी घेणारा शमी भारताचा सहावा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आशिष नेहरा, व्यंकटेश प्रसाद, युवराज सिंह, रॉबिन सिंह, कपिल देव यांनी विश्वचषकात पाच बळी मिळवले होते.

विश्वचषकातील सामन्यात पाच बळी मिळवणारा शमीला हा सहावा गोलंदाज ठरला असला तरी सलग तीन सामन्यांमध्ये चारपेक्षा जास्त बळी एकाही भारतीय गोलंदाजाला मिळवता आलेले नाही. त्यामुळे सलग तीन सामन्यांमध्ये चारपेक्षा जास्त बळी मिळवणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

 यंदाच्या विश्वचषकातील सर्वात हायहोल्टेज लढतींपैकी एक असलेली भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढत बर्मिंगहम येथे सुरू आहे. या लढतीत इंग्लंडच्या संघाने 50 षटकांत 337 धावा कुटत भारतासमोर 338 धावांचे आव्हान ठेवले आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील एका अजब योगायोगाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे भारत आणि इंग्लंडचे संघ याआधी जेव्हा 2011च्या विश्वचषकात आमनेसामने आले होते तेव्हा दोन्ही संघांनी प्रत्येकी 338 धावा बनवल्या होत्या. त्यामुळे ती लढत टाय झाली होती.

2011च्या विश्वचषकात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या त्या लढतीत दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर सचिन तेंडुलकरचे झंझावाती शतक आणि गौतम गंभीर आणि युवराज सिंहने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 338 धावा फटकावल्या होत्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना दीडशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसने इयान बेलसह 160 धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजयासमिप नेले होते. पण अखेरच्या षटकांमध्ये झहीर खान आणि मुनाफ पटेल यांनी टिच्चून मारा करत सामना टाय करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे आज 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेमकं काय होतं याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

टॅग्स :मोहम्मद शामीवर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध इंग्लंड