Join us  

India vs England : इंग्लंड पाचव्या कसोटीत मैदानावर उतरवणार फिरकी 'अस्त्र'; दोन तगड्या खेळाडूंचे संघात कमबॅक

चौथ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंड संघावर मालिका वाचवण्याची टांगती तलवार आहे. टीम इंडियानं चौथ्या कसोटीत १५७ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 4:53 PM

Open in App

चौथ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंड संघावर मालिका वाचवण्याची टांगती तलवार आहे. टीम इंडियानं चौथ्या कसोटीत १५७ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. १० सप्टेंबरपासून मालिकेतील पाचवा व शेवटचा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्याचा इंग्लंडचा मानस आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी पाचव्या कसोटीसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला. 

'जॉनी बेअरस्टोला शून्यावर बाद केल्याबद्दल आभार, तो माझ्यावर रागावला होता'

या संपूर्ण मालिकेत इंग्लंडचा संघ जो रूट याच्या फलंदाजीवरच अवलंबून असलेला पाहायला मिळाला. फलंदाजांचे अपयश हे इंग्लंडच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. रोरी बर्न्स व हसीब हमीद ही सलामीची जोडी ही इंग्लंडसाठी चौथ्या कसोटीतील सकारात्मक बाब म्हणावी लागले. फलंदाजीतील त्रुटी दूर करण्यासाठी इंग्लंडनं पाचव्या कसोटीत दोन नवीन खेळाडूंला बोलावले आहे. मुलीच्या जन्मासाठी चौथ्या कसोटीतून विश्रांती घेणारा जोस बटलर पुन्हा संघात परतला आहे, तर सॅम बिलिंग हा पुन्हा कौंटी क्लब केंटसाठी खेळण्यास रवाना झाला आहे. इंग्लंडनं फिरकीपटू जॅक लिच याला पाचारण केले आहे.  

इंग्लंडचा संघ - जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेंन्स, जॅक लिच, डेवीड मलान, क्रेग ओव्हर्टन, ओली पोप, ऑली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वूड ( England squad for the 5th Test vs India:  Joe Root Moeen Ali, James Anderson, Jonathan Bairstow, Rory Burns, Jos Buttler, Sam Curran, Haseeb Hameed, Dan Lawrence, Jack Leach, Dawid Malan, Craig Overton, Ollie Pope, Ollie Robinson, Chris Woakes, Mark Wood.) 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजोस बटलर
Open in App