Join us  

India VS England : ज्यो रुटचा आगळावेगळा विक्रम

Joe Root : भारताविरुद्ध नागपूरच्या व्हीसीए जामठा स्टेडियमवर २०१२-१३ ला कसोटी पदार्पण करणारा इंग्लंडचा कर्णधार येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीद्वारे शंभरावा सामना खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 5:52 AM

Open in App

चेन्नई : भारताविरुद्ध नागपूरच्या व्हीसीए जामठा स्टेडियमवर २०१२-१३ ला कसोटी पदार्पण करणारा इंग्लंडचा कर्णधार येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीद्वारे शंभरावा सामना खेळत आहे. रुटने पहिला, ५० वा आणि आता शतकी सामना भारताविरुद्ध खेळला हे विशेष. या उपलब्धीसाठी सहकारी बेन स्टोक्स याने त्याचा शुक्रवारी विशेष कॅप देऊन सन्मान केला. याशिवाय इंग्लंडचे राष्ट्रीय निवडकर्ते एड स्मिथ यांनीदेखील त्याला कॅप भेट दिली. १९ शतके आणि ४९ अर्धशतकांसह ८२४९ धावा काढणाऱ्या रुटने ५० वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला होता. याशिवाय ५०वी कसोटी खेळत असलेल्या जोस बटलरला रुटने विशेष कॅप प्रदान केली. सलग तिसरे शतकरुटने सलग तिसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली. त्याने ९८, ९९ आणि १०० व्या सामन्यात शतक ठोकले. अशी कामगिरी करणारा तो पिहला खेळाडू ठरला. भारताविरुद्ध हे त्याचे पाचवे तर एकूण २० वे शतक आहे. 

इंग्लंडच्या खेळाडूंनी या सामन्यात दंडावर काळी फीत बांधली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सेनेचे माजी कॅप्टन आणि कोरोना प्रकोपात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सर टॉम मुरे यांच्या सन्मानार्थ ही पट्टी बांधली आहे. मुरे यांचे नुकतेच कोरोनामुळे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाल्याची माहिती ईसीबीच्या माध्यम व्यवस्थापकाने दिली. शतकी कसोटीत शतक ठोकणारा रुट तिसरा शंभराव्या कसोटीत शतक ठेकणारा ज्यो रुट तिसरा इंग्लिश खेळाडू ठरला. त्याच्या आधी कॉलिन काऊड्री आणि ॲलेक स्टीर्ट यांनी ही कामगिरी केल होती. वेस्ट इंडिजकडून गॉर्डन ग्रिनिज, पाकचा जावेद मियांदाद सतेच द. आफ्रिकेचे ग्रॅमी स्मिथ आणि हाशिम अमला यांनी हा मान मिळवला आहे. रिकी पाँटिंगने शतकी सामन्यात दोन्ही डावांत शतके ठोकण्याचा विक्रम केला.

टॅग्स :जो रूटभारत विरुद्ध इंग्लंडआंतरराष्ट्रीय क्रिकेट