Join us  

IND vs ENG : आनंद गगनात मावेना; रिषभ पंतचा कोरोनावर यशस्वी वार, रवी शास्त्रींनी त्याच्यासाठी आणला हार, Photo

India vs England, Rishabh Pant :रिषभ पंत आता कोरोनामुक्त झाला असून, तो आता भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंसोबत तो डरहॅम येथे बायो बबलमध्ये दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 7:19 PM

Open in App

India vs England, Rishabh Pant : सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठा धक्का बसला होता. दरम्यान, रिषभ पंत आता कोरोनामुक्त झाला असून, तो आता भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंसोबत तो डरहॅम येथे बायो बबलमध्ये दाखल झाला आहे. बीसीसीआयने गुरुवारी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. रिषभ पंत बरा होऊन आल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आनंद गगनात मावेनासा झाला अन् त्यांनी त्याच्या स्वागतासाठी फुलांचा हार मागवला. रिषभनेही या ग्रँड वेलकमसाठी शास्त्री गुरुजींचे आभार मानत फोटो पोस्ट केले. 

८ जुलै रोजी रिषभचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कौंटी एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्याला तो मुकला होता. आता रिषभ पंत दुसरा सराव सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात निवडीसाठी उपलब्ध आहे. डरहॅममध्ये भारतीय संघासोबत येण्यापूर्वी रिषभ पंत हा दहा दिस आयसोलेशनमध्ये होता. सराव सामन्यात त्याच्याऐवजी के.एल. राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच राहुलने भारतीय संघातील आपली दावेदारी भक्कम करताना शतकी खेळीही केली होती.

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

इंग्लंडचा संघ ( England Men’s Test Squad) - जो रूट ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, मार्क वूड 

इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतरवी शास्त्री