India vs England : इंग्लंड खेळणार हजारावा कसोटी सामना

१५ मार्च १८७७ रोजी इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना झाला होता.

By आकाश नेवे | Updated: July 25, 2018 06:49 IST2018-07-24T20:38:46+5:302018-07-25T06:49:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs England: England will play 100th test match | India vs England : इंग्लंड खेळणार हजारावा कसोटी सामना

India vs England : इंग्लंड खेळणार हजारावा कसोटी सामना

ठळक मुद्देभारताने ५२२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात १४५ सामन्यात विजय मिळवला.

- आकाश नेवे

भारत विरुद्ध इंग्लंड ही कसोटी मालिका १ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. या सामन्यात १ आॅगस्टलाच इंग्लंडचा संघ एक हजार कसोटी सामने खेळण्याचा विक्रम करणार आहे. इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत एकूण ९९९ कसोटी सामने खेळले आहेत. भारताविरोधातील मालिकेतील हा त्यांचा हजारावा सामना असेल.

१५ मार्च १८७७ रोजी इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना झाला होता. तो क्रिकेटच्या इतिहासातील पहिला अधिकृत कसोटी सामना होता. त्यावेळी इंग्लंडचे कर्णधार होते जेम्स लिलिव्हिटेंजर. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने ४५ धावांनी विजय मिळवला. तेथूनच जागतिक क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर आतापर्यंत एकूण २०१३ कसोटी सामने खेळले गेले. त्यात इंग्लंडने सर्वाधिक ९९८ सामने खेळले आहेत. आॅस्ट्रेलियाने ८१२ कसोटी सामने खेळले आहेत. असे असले तरी आॅस्ट्रेलियाने इंग्लंडपेक्षा जास्त कसोटीत विजय मिळवला आहे. आॅस्ट्रेलियाने ३८३, तर इंग्लंडने ३५७ कसोटी सामने जिंकले आहेत. भारताने ५२२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात १४५ सामन्यात विजय मिळवला. या यादीत आॅस्ट्रेलियानंतर विंडीजचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. विंडीजने ५३५ कसोटी सामने खेळले आहेत.

कोणत्या संघाने खेळले किती सामने-
इंग्लंड ९९९, आॅस्ट्रेलिया ८१२, वेस्ट इंडिज ५३५, भारत ५२२, दक्षिण आफ्रिका ४२७, न्यूझीलंड ४२६, पाकिस्तान ४१७, श्रीलंका २७४, बांगलादेश १०८, झिम्बाब्वे १०५, अफगाणिस्तान १, आयर्लंड १. 

Web Title: India vs England: England will play 100th test match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.