Join us  

India vs England: ... अन् एकनाथ सोलकर यांची आठवण पाचव्या कसोटीत येणार

1971 साली इंग्लंडच्या दौऱ्यात भारताने ओव्हल मैदानावर कसोटी सामना जिंकला होता. या सामन्यात त्यांनी पकडलेले झेल हे सामन्यात निर्णायक ठरले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 5:13 PM

Open in App
ठळक मुद्देसोलकर यांनी 1972-73 साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यात तब्बल 12 झेल पकडले होते. इंग्लंड दौऱ्यात पकडलेले हे सर्वाधिक झेल आहेत.

नवी दिल्ली, भारत विरुद्ध इंग्लंड : एकनाथ सोलकर. भारताचे एक गुणवान क्रिकेटपटू. मुंबईचा खडूसपणा त्यांच्या रक्तात होता. दमदार फलंदाज आणि वेगवान गोलंदाज यापेक्षाही चतुर क्षेत्ररक्षक अशी त्यांची खास ओळक होती. आता एवढी वर्षे झाली तरी सोलकर यांची आठवण भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात आल्या वाचून राहणार नाही.

भारताने 1971 साली जो ऐतिहासिक विजय मिळवला त्याचे साक्षीदार होते. त्यांनी टिपलेल्या अप्रतिम झेलांमुळेच भारताला विजय मिळवता आले होते. 1971 साली इंग्लंडच्या दौऱ्यात भारताने ओव्हल मैदानावर कसोटी सामना जिंकला होता. या सामन्यात त्यांनी पकडलेले झेल हे सामन्यात निर्णायक ठरले होते.

सोलकर यांनी 1971 नंतर जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळायला गेला होता, तेव्हा एक विक्रम रचला होता. तो विक्रम अजूनही अबाधित आहे. पण भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या सामन्यात या विक्रमाची बरोबर होऊ शकते किंवा हा विक्रम मोडीत निघू शकतो.

सोलकर यांनी 1972-73 साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यात तब्बल 12 झेल पकडले होते. इंग्लंड दौऱ्यात पकडलेले हे सर्वाधिक झेल आहेत. भारताच्या किंवा इंग्लंडच्या एकाही खेळाडूला त्यांचा हा विक्रम मोडता आलेला नाही. पण लोकेश राहुल आणि अॅलिस्टर कुक हे या विक्रमाच्या जवळ आले आहेत. या दोघांनीही आतापर्यंतच्या दौऱ्यात 11 झेल पकडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी जर एक झेल टिपला तर ते या विक्रमाशी बरोबरी करू शकतात किंवा दोन झेल टिपले तर नवीन विक्रम त्यांच्या नावावर होऊ शकतो.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड