Join us  

India vs England 5th Test : मोहम्मद शमी पाचव्या कसोटीसाठी झालाय फिट; पण रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्या खेळण्यावर संभ्रम

India vs England 5th Test : १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी टीम इंडिया सहज सोडणार नाही. ओव्हल कसोटीत विजय मिळवून टीम इंडियानं मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 7:49 PM

Open in App

India vs England 5th Test : १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी टीम इंडिया सहज सोडणार नाही. ओव्हल कसोटीत विजय मिळवून टीम इंडियानं मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या मँचेस्टर कसोटीत इंग्लंडकडून जोरदार प्रत्युत्तर  नक्की मिळेल. असे असताना टीम इंडियाच्या गोटात तणावाचे वातावरण आहे. सलामीवीर रोहीत शर्मा ( Rohit Sharma) व मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हे अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेले नाहीत आणि बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्यांच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेऊन आहे. ही दोघं खेळतील की नाही, याबाबत मँचेस्टर कसोटीच्या नाणेफेकीपूर्वीच स्पष्ट होईल. टीम इंडियासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) हा तंदुरूस्त झाला असून पाचव्या कसोटीत तो खेळण्याची शक्यता वाढली आहे. 

इंग्लंडनं पुन्हा उप कर्णधार बदलला; पाचव्या कसोटीत प्लेईंग इलेव्हनसाठी दोन खेळाडूंमध्ये होणार टॉस!

शमीला दुखापतीमुळे चौथ्या कसोटीतून विश्रांती घ्यावी लागली होती आणि तो आता पूर्णपणे तंदुरूस्त झाल्याचे वृत्त PTI ने दिले आहे. ''शमी हा पूर्णपणे तंदुरूस्त झाला आहे आणि तो पाचव्या कसोटीत तो खेळेल हे निश्चित आहे, ''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराहनं या मालिकेत १५१ षटकं फेकली आहेत आणि १८ विकेट्स घेतल्या आहेत. आगामी आयपीएल व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. पण, बुमराह खेळला, तर मोहम्मद सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. 

मोठी घडामोड; रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा मैदानावर नाही उतरले, जाणून घ्या कारण

उमेश यादव ( ६ विकेट्स) व शार्दूल ठाकूर ( दोन अर्धशतकं व ३ विकेट्स) यांनी चौथ्या कसोटीत केलेल्या कामगिरीनंतर त्यांना वगळणे अशक्य आहे. मँचेस्टरची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना साथ देणारी असल्याची चर्चा आहे आणि अशात आतापर्यंत बाकावर बसवलेल्या आर अश्विनलाही संधी मिळू शकते.   

India Playing XI: फॉर्माशी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेला मिळणार डच्चू अन् प्रमुख गोलंदाजाला विश्रांती?

चौथ्या कसोटीत रोहित शर्माच्या मांडीला दुखापत झाली होती, तर चेतेश्वर पुजाराची घोटा दुखावला गेला होता. त्यामुळेच ते चौथ्या व पाचव्या दिवशी क्षेत्रक्षणाला मैदानावर उतरले नव्हते. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्यांच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेऊन आहे. रोहित तंदुरुस्त होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी अंतिम निर्णय हा वैद्यकीय टीमच घेणार आहे. रोहित न खेळल्यास अभिमन्यू इस्वरन, मयांक अग्रवाल व पृथ्वी शॉ हे पर्याय आहेत. पुजाराच्या गैरहजेरीत हनुमा विहारी व सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माचेतेश्वर पुजारामोहम्मद शामी
Open in App