India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीत पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माने चांगली फटकेबाजी केली आणि २ मोठे विक्रम नावावर केले. तेच यशस्वी जैस्वालने पहिली धाव घेताच विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला.
हा मान तुझा! कुलदीप यादवने देऊ केलेला सन्मान आर अश्विनने नम्रपणे नाकारला, मन जिंकलं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गडगडला आणि सर्व विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. कुलदीप यादवने कसोटी पाच ( ५-७२) विकेट्स घेताना कसोटी कारकीर्दित ५० बळींचा टप्पा ओलांडला. सर्वात कमी चेंडूत कसोटीत ५० विकेट्स घेणारा तो भारतीय फिरकीपटू ठरला. १०० वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ११.४-१-५१-४ अशी स्पेल टाकली. रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्यामागोमाग जॉनी बेअरस्टो ( २९), बेन डकेट ( २७), जो रूट ( २६) व बेन फोक्स ( २४) यांनी चांगला खेळ केला.
यशस्वीने डावातील पहिली धाव घेताच विराटचा विक्रम मोडला. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाचा सर्वाधिक ६५५ धावांचा विराटचा विक्रम ( २०१६) यशस्वीने नावावर केला. या मालिकेत दोन द्विशतकासह यशस्वीने ६६५ हून अधिक धावा केल्या आहेत.
दुसऱ्या बाजूने रोहितने खणखणीत षटकार खेचून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ५० षटकार खेचणाऱ्या पहिल्या आशियाई आणि जगातील दुसऱ्या ( बेन स्टोक्स- ७८) फलंदाजाचा मान पटकावला. आज २० धाव करताच त्याने कसोटीत कर्णधार म्हणून १००० धावांचा पल्ला ओलांडला आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये असा पराक्रम करणारा तो सहावा कर्णधार ठरला.