साऊदम्टन, भारत वि. इंग्लंट कसोटीः सॅम कुरनने पुन्हा एकदा उपयुक्त खेळी साकारून इंग्लंडला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजयासाठी भारतासमोर 245 धावांचे लक्ष्य आहे. इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांत गडगडला. कुरनने 46 धावांची उपयुक्त खेळी केली.
8 बाद 260 धावांवरून इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात केली. मोहम्मद शमीने दिवसातील पहिल्याच चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडला बाद केले. त्यानंतर कुरनने स्ट्राईक स्वतःकडे राखताना धावसंख्या वाढवण्याचे प्रयत्न केले. पण, अतिरिक्त धाव घेण्याचा नादात तो धावबाद झाला आणि इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांवर गडगडला. कुरनने 128 चेंडूंत 6 चौकारांसह 46 धावा केल्या.