R Ashwin ची ऐतिहासिक कामगिरी! असा विक्रम जो एकाही आशियाई खेळाडूला जमला नाही

आर अश्विनने इंग्लंडचा सेट फलंदाज जॉनी बेअरस्टोला बाद करून ऐतिहासिक कामगिरी केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:40 AM2024-02-23T11:40:49+5:302024-02-23T11:46:59+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th Test Live Update : Ravi Ashwin becomes first Asian to have scored 1000+ runs and picked 100+ wickets against England in Test cricket history, England on 112/5 at lunch  | R Ashwin ची ऐतिहासिक कामगिरी! असा विक्रम जो एकाही आशियाई खेळाडूला जमला नाही

R Ashwin ची ऐतिहासिक कामगिरी! असा विक्रम जो एकाही आशियाई खेळाडूला जमला नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th Test Live Update Marathi News : भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवताना इंग्लंडचा निम्मा संघ ११२ धावांवर तंबूत पाठवला. पदार्पणवीर आकाश दीपने ( Akash Deep) ३ विकेट्स घेताना इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. त्यात रवींद्र जडेजाआर अश्विन यांनी दोन धक्के देताना भारताला सामन्यात पकड मिळवून दिली. आर अश्विनने इंग्लंडचा सेट फलंदाज जॉनी बेअरस्टोला बाद करून ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला माघारी पाठवले. 

W,W,W! पदार्पणवीर आकाश दीपने इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले; ३ धक्के दिले, Video 


पदार्पणवीर आकाश दीपने ( Akash Deep) चौथ्या कसोटीत टीम इंडियाला जसप्रीत बुमराहची उणीव अजिबात भासू दिली नाही. पहिल्या षटकापासून त्याने टिच्चून मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवले होते.  २७ वर्षीय गोलंदाज आकाशने पहिल्या स्पेलमध्ये ७ षटकं फेकून २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याने काच षटकात बेन डकेट ( ११) व ऑली पोप ( ०) यांना माघारी पाठवले, नंतर ४२ धावा करणाऱ्या क्रॉलीला त्रिफळा उडवला. क्रॉलीचा त्याने सुरुवातीच्या षटकातच त्रिफळा उडवला होता, परंतु नो बॉलमुळे त्याला जीवदान मिळाले होते. 


जॉनी बेअरस्टो आणि जो रूट हे या मालिकेत सपशेल अपयशी ठरले होते. पण, आज बेअरस्टो चांगल्या टचमध्ये दिसला आणि त्याने रूटसोबत अर्धशतकी भागीदारी केली. आर अश्विनने ही जोडी तोडताना बेअरस्टाला ( ३८) पायचीत केले. इंग्लंडविरुद्ध अश्विनची ही कसोटीतील १००वी विकेट ठरली. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धही ( ११४) हा टप्पा ओलांडला आहे. पण, एकाच संघाविरुद्ध १०० विकेट्स व १००० हून अधिक धावा करणारा तो पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध १०८५ धावा केल्या आहेत. 

एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत १०००+ धावा व १००+ विकेट्स 
गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) वि. इंग्लंड
माँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंड
विलफ्रेड ऱ्होड्स ( इंग्लंड) वि. ऑस्ट्रेलिया
इयान बॉथम ( इंग्लंड) वि. ऑस्ट्रेलिया
जॉर्ज गिफन ( ऑस्ट्रेलिया ) वि. इंग्लंड
स्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड ) वि. ऑस्ट्रेलिया
आर अश्विन ( भारत) वि. इंग्लंड 
 

Web Title: India vs England 4th Test Live Update : Ravi Ashwin becomes first Asian to have scored 1000+ runs and picked 100+ wickets against England in Test cricket history, England on 112/5 at lunch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.