IND vs ENG 4th Test : जैस्वालची आणखी एक विक्रमी खेळी, सर डॉन ब्रॅडमननंतर तोच 'यशस्वी'!

India vs England 4th Test जो रूटने भारताला ८७ धावांवर पहिला धक्का देताना यशस्वीला ( ३७) झेलबाद केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 10:35 AM2024-02-26T10:35:42+5:302024-02-26T10:35:59+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : Yashasvi Jaiswal dismissed for 37 in 44 balls, equal with virat kohli & Yashasvi Jaiswal has the MOST runs by Indians in first 8 Tests of career (971) | IND vs ENG 4th Test : जैस्वालची आणखी एक विक्रमी खेळी, सर डॉन ब्रॅडमननंतर तोच 'यशस्वी'!

IND vs ENG 4th Test : जैस्वालची आणखी एक विक्रमी खेळी, सर डॉन ब्रॅडमननंतर तोच 'यशस्वी'!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : भारत-इंग्लंड चौथ्या कसोटी मालिकेत यजमान विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. रोहित शर्माने अर्धशतक झळकावून इंग्लंडला हैराण केले आहे आणि यशस्वी जैस्वालसह त्याने ८४ धावांची भागीदारी केली. यशस्वी ३७ धावांवर बाद झाला, परंतु त्याने मोठा विक्रम नोंदवला. 

रोहित नव्हे, तर पाचव्या कसोटीत ३७ वर्षीय खेळाडूने नेतृत्व करावे; सुनील गावस्करांची मागणी 


आकाश दीप, ध्रुव जुरेल या युवा खेळाडूंसोबत आर अश्विन व कुलदीप यादव या सिनीयर्सनी भारतीय संघाला विजयपथावर आणून बसवले आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तारात भारताने ३०७ धावा केल्या. ध्रुव जुरेलच्या ९० धावांच्या खेळीमुळे इंग्लंडला केवळ ४६ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. त्यानंतर अश्विन ( ५-५१) व कुलदीप ( ४-२२) यांनी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळला. भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले गेले, परंतु मागील १० वर्षांत भारताला फक्त एकदाच चौथ्या डावात १५०+ ( गॅबा कसोटी) धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे.


रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी तिसऱ्या दिवशी ४० धावा चोपून भारताच्या विजयाचा पाया भक्कम केला होता. रोहितने चौथ्या दिवशी जेम्स अँडरसनला खेचलेला षटकार पाहून बेन स्टोक्स अवाक् झाला... या षटकारासह रोहितने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण केल्या. जो रूटने भारताला ८७ धावांवर पहिला धक्का देताना यशस्वीला ( ३७) झेलबाद केले.  घरच्या मैदानावरील एकाच कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या  ६५५ ( ८ इनिंग्ज, २०१६) सर्वाधिक धावांच्या विक्रमाशी यशस्वीने आज बरोबरी केली. या विक्रमात सुनील गावस्कर ७३२ ( वि. वेस्ट इंडिज, ९ इनिंग्ज, १९७८) धावांसह आघाडीवर आहे.  

भारतासाठी द्विपक्षीय कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा:
विराट कोहली - 2016 मध्ये 655 (होम)
यशस्वी जैस्वाल - 2024 मध्ये 655 ( होम) 
राहुल द्रविड - 2002 मध्ये 602 (अवे)
विराट कोहली - 2018 मध्ये 593 (अवे)
विजय मांजरेकर - 1961 मध्ये 586 (होम)

 

कसोटी क्रिकेटच्या पहिल्या ८ कसोटींत सर्वाधिक ९७१ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम यशस्वीने नावावर केला. या विक्रमात तो सर डॉन ब्रॅडमन ( १२१०) यांच्यानंतर दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.   

पहिल्या आठ कसोटींनंतर सर्वाधिक धावा:

सर एव्हर्टन वीक्स (WI) - 968 (11 डाव)
सुनील गावस्कर (IND) - 938 (16 डाव)
सौद शकील (PAK) - 927 (15 डाव)

Web Title: India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : Yashasvi Jaiswal dismissed for 37 in 44 balls, equal with virat kohli & Yashasvi Jaiswal has the MOST runs by Indians in first 8 Tests of career (971)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.