IND vs ENG 4th Test : W,W! आर अश्विनने दोन चेंडूंत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले, अनिल कुंबळेचा मोडला विक्रम 

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०७ धावा केल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:40 PM2024-02-25T12:40:09+5:302024-02-25T12:40:24+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : R ASHWIN ON FIRE - 2 IN 2, Ben Duckett & ollie Pope out, Ravi Ashwin has taken most Test wickets in India | IND vs ENG 4th Test : W,W! आर अश्विनने दोन चेंडूंत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले, अनिल कुंबळेचा मोडला विक्रम 

IND vs ENG 4th Test : W,W! आर अश्विनने दोन चेंडूंत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले, अनिल कुंबळेचा मोडला विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News :  इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०७ धावा केल्या. ७ बाद १७७ अशी अवस्था असताना ध्रुव जुरेल व कुलदीप यादव मैदानावर उभे राहिले आणि त्यांनी ७६ धावांची भर घातली.  जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर कुलदीप ( २८) दुर्दैवीरित्या बाद झाला. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर आला असताना दुसऱ्या बाजूने शोएब बशीरने डावातील पाचवी विकेट घेतली आणि आकाश दीपला ( ९) पायचीत करून माघारी पाठवले. टॉम हार्टलीने ध्रुवचा त्रिफळा उडवला. जुरेल १४९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ९० धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव ३०७ धावांवर गडगडला. इंग्लंडने पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेतली.   

IND vs ENG 4th Test : अर्धशतक पूर्ण होताच ध्रुव जुरेलचे कडक सॅल्यूट! कारगिल युद्धात लढले होते त्याचे वडील 

शोएब बशीरने ११९ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. भारतात कसोटीत पाच विकेट घेणारा तो दुसरा युवा गोलंदाज ठरला. यापूर्वी १९९६ मध्ये पॉल अॅडम्सने ( १९ वर्ष व २३३ दिवस) हा पराक्रम केला होता.  रांची येथे पाच विकेट्स घेणारा बशीर हा दुसरा फिरकीपटू ( रवींद्र जडेजा ५-१२४ वि. ऑस्ट्रेलिया, २०१७) ठरला. रोहितने नवा चेंडू आर अश्विनच्या हातात दिला आणि १९ धावांवर इंग्लंडला पहिला धक्का बसला. बेन डकेट ( १५) झेलबाद होऊन माघारी परतला. आर अश्विनची ही घरच्या मैदानावरील ३५०वी विकेट ठरली. पुढच्याच चेंडूवर अश्विनने ऑली पोपला ( ०) पायचीत करून माघारी पाठवले आणि त्याने अनिल कुंबळेचा ( ३५०) विक्रम मोडला. 


घरच्या मैदानावर कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विनने ( ३५१) चौथ्या स्थानी झेप घेतली. मुथय्या मुरलीधरन ( ४९३), जेम्स अँडरसन ( ४३४) व स्टुअर्ट ब्रॉड ( ३९८) हे आघाडीवर आहेत.  

Web Title: India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : R ASHWIN ON FIRE - 2 IN 2, Ben Duckett & ollie Pope out, Ravi Ashwin has taken most Test wickets in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.