IND vs ENG 4th Test : भारतीय संघाचे जबरदस्त पुनरागमन; कुलदीप, अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडची कोंडी

कुलदीप यादवच्या ( Kuldeep Yadav) फिरकीने भारतीय संघाला चौथ्या कसोटीत पुनरागमन करून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 03:54 PM2024-02-25T15:54:38+5:302024-02-25T15:57:45+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : Indian team makes a great comeback; great bowling by Kuldeep Yadav and R Ashwin, England all out on 145, indian need 192 runs to win | IND vs ENG 4th Test : भारतीय संघाचे जबरदस्त पुनरागमन; कुलदीप, अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडची कोंडी

IND vs ENG 4th Test : भारतीय संघाचे जबरदस्त पुनरागमन; कुलदीप, अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडची कोंडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) आणि आर अश्विन ( R Ashwin ) यांच्या फिरकीने भारतीय संघाला चौथ्या कसोटीत पुनरागमन करून दिले. पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंड मोठी धावसंख्या उभी करेल असे वाटले होते. पण, आर अश्विनने सुरुवातीला दोन धक्के दिले आणि त्यानंतर कुलदीपने कमाल केली. कुलदीपने चार, तरअश्विनने पाच विकेट्स घेतल्या. 


आर अश्विनने नव्या चेंडूवर त्याने बेन डकेट ( १५) व ऑली पोप ( ०) यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवले. झॅक क्रॉली एका बाजूने आक्रमक फटकेबाजी करत होता. पहिल्या डावातील शतकवीर जो रूटला ( ११) अश्विनने पायचीत करून तिसरा धक्का दिला. यानंतर कुलदीप यादवने कमाल केली. ९१ चेंडूंत ७ चौकारांसह ६० धावा करणाऱ्या क्रॉलीचा त्रिफळा उडवून कुलदीपने भारताला मोठे यश मिळवून दिले. बेन स्टोक्सला अम्पायर कॉलमुळे जीवदान मिळाले खरे, परंतु कुलदीपने त्याचाही त्रिफळा उडवला.  



टी ब्रेकनंतर जडेजाने भारताला आणखी एक मोठं यश मिळवून देताना जॉनी बेअरस्टोला ( ३०) माघारी पाठवले. आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात टॉम हार्टली ( ७) कुलदीपच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. सर्फराज खानने अफलातून झेल घेतला. त्याच षटकात ऑली रॉबिन्सनला ( ०) पायचीत करून इंग्लंडला आठवा धक्का दिला. बेन फोक्सवरच आता इंग्लंडची मदार होती आणि शोएब बशीरसोबत तो खेळपट्टीवर उभा राहिला, परंतु धावांचा ओघ पूर्णपणे आटला होता.  फोक्सला १७ धावांवर अश्विनने कॉट अँड बोल्ड करून इंग्लंडचा नववा फलंदाज तंबूत पाठवला. अँडरसनलाही बाद करून अश्विनने इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळला. भारताला विजयासाठी १९१ धावाच करायच्या आहेत.


तत्पूर्वी, इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०७ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल ( ७३) आणि ध्रुव जुरेल ( ९०) यांनी भारताला तीनशेपार नेले. ध्रुव जुरेल व कुलदीप यादव ( २८) यांनी ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली.  इंग्लंडने पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेतली. शोएब बशीरने ११९ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. 
 

Web Title: India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : Indian team makes a great comeback; great bowling by Kuldeep Yadav and R Ashwin, England all out on 145, indian need 192 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.