Join us  

India vs England 3rd Test: विराट कोहलीचे दमदार शतक

कोहलीचे या दौऱ्यातील हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 8:51 PM

Open in App
ठळक मुद्दे कोहलीने 191 चेंडूंत दहा चौकारांनिशी यावेळी शतकाला गवसणी घातली.

नॉटिंगहम : भरताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. 92व्या षटकात कोहलीने चौकार लगावत कारकिर्दीतले 23वे शतक साजरे केले. कोहलीचे या दौऱ्यातील हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. कोहलीने 191 चेंडूंत दहा चौकारांनिशी यावेळी शतकाला गवसणी घातली.

 

शतक झळकावल्यावर कोहलीला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने कोहलीला पायचीत पकडत तंबूचा रस्ता दाखवला. कोहलीने 197 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी साकारली.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट