आर अश्विनशिवाय भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला रडवले, पहिल्या डावात घेतली शतकी आघाडी

भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी चांगले पुनरागमन केले. बेन डकेट १५३ धावांवर माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 12:56 PM2024-02-17T12:56:27+5:302024-02-17T12:56:49+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test Live Updates Day 3 - Indian bowlers destroy England batting without Ashwin, England all out for 319, team india take 126 runs lead  | आर अश्विनशिवाय भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला रडवले, पहिल्या डावात घेतली शतकी आघाडी

आर अश्विनशिवाय भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला रडवले, पहिल्या डावात घेतली शतकी आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd Test Live Updates Day 3 ( Marathi News ) - भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी चांगले पुनरागमन केले. बेन डकेट १५३ धावांवर माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला गुंडाळले.  कुलदीप यादव व रवींद्र जडेज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. 


आर अश्विनला कौटुंबिक कारणामुळे अचानक तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. देवदत्त पडिक्कल बदली खेळाडू म्हणून संघात खेळतोय. कुलदीप यादवने फिरकीवर शतकवीर बेन डकेटची विकेट मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना रांग लावली. तिसऱ्या दिवसाची पहिली विकेट जसप्रीत बुमराहने मिळवली आणि त्याने जो रुटला ( १८) बाद केले. कुलदीपने जॉनी बेअरस्टोला भोपळाही फोडू दिला नाही.  बेन डकेटने १५१ चंडूंत २३ चौकार व २ षटकारांसह १५३ धावांवर कुलदीपचा शिकार बनला.  


डकेट व बेन स्टोक्स यांच्या ३५ धावांच्या भागीदारीनंतर स्टोक्स व बेन फोक्स ही जोडी ( ३९ धावा ) सेट झाली होती. पण, रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्यासाठी स्टोक्स ( ४१) गेला अन् बाऊंड्रीवर जसप्रीत बुमराहने सोपा झेल टिपला. भारतात कसोटीत २०० विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा भारताचा ५ वा गोलंदाज ठरला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही त्याची पाचशेवी विकेट ठरली.  पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजने मोठा धक्का दिला आणि फोक्स १३ धावांवर रोहित शर्माला झेल देऊन परतला.  


 सिराजने आणखी एक धक्का देताना रेहान अहमदचा ( ६) त्रिफळा उडवून इंग्लंडला ८ वा धक्का दिला. जडेजाने पुढच्या षटकात टॉम हार्टलीला ( ९) यष्टीचीत केले. सिराजने डावातील चौथी विकेट घेताना इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर गुंडाळला आणि भारताने पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी घेतली. 

Web Title: India vs England 3rd Test Live Updates Day 3 - Indian bowlers destroy England batting without Ashwin, England all out for 319, team india take 126 runs lead 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.