२५ चेंडूंत १०४ धावा चोपल्या! Ben Duckett ची एकाग्रता कुलदीप यादवने तोडली, विकेट मिळवली

India vs England 3rd Test Live Updates Day 3 - तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय गोलंदाजांनी गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 10:57 AM2024-02-17T10:57:00+5:302024-02-17T10:57:27+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test Live Updates Day 3 -  Ben Duckett scored 153 runs (151) with 23 fours and 2 sixes, kuldeep yadav gets wicket, england 260/5 (50.1 Ov) | २५ चेंडूंत १०४ धावा चोपल्या! Ben Duckett ची एकाग्रता कुलदीप यादवने तोडली, विकेट मिळवली

२५ चेंडूंत १०४ धावा चोपल्या! Ben Duckett ची एकाग्रता कुलदीप यादवने तोडली, विकेट मिळवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd Test Live Updates Day 3 ( Marathi News ) - तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय गोलंदाजांनी गाजवले. इंग्लंडच्या बेन डकेटने ( Ben Duckett ) १५३ धावांची आक्रमक खेळी करून भारताचे टेंशन वाढवले होते. पण, कुलदीप यादवने त्याला फिरकीच्या जाळ्यात ओढले आणि चतुराईने ही विकेट मिळवली. त्याआधी कुलदीपने जॉनी बेअरस्टोची आणि जसप्रीत बुमराहने जो रुटची विकेट घेतली. ४४५ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा निम्मा संघ २६० धावांत तंबूत परतला आहे. 


भारताच्या पहिल्या डावाच्या ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात सलामीवीर बेन डकेटने वेगवान शतक झळकावताना इंग्लंडला दुसऱ्या दिवशी २ बाद २०७ धावांपर्यंत पोहोचवले. झॅक क्रॉली ( १५) याची विकेट घेऊन अश्विनने कसोटीत ५०० वी विकेट पूर्ण केली. पण, डकेट व ऑली पोप ( ३९) यांनी  ९३ धावांची भागीदारी करताना डाव सावरला. पण, आर अश्विनला कौटुंबिक कारणामुळे अचानक तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली.

भारतीय संघाने १० प्रमुख व १ राखीव खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आर अश्विनची रिप्लेसमेंट झालेली नाही. देवदत्त पडिक्कल अश्विनला रिप्लेसमेंट म्हणून संघात खेळतोय. जसप्रीत बुमराहने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जो रूटला ( १८) माघारी पाठवले. बुमराहला रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रूट स्लीपमध्ये यशस्वीच्या हाती झेल देऊन परतला. कुलदीप यादवने पाठोपाठ जॉनी बेअरस्टोला (०) पायचीत करून इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. 


बेन डकेटने १५०+ धावांचा टप्पा ओलांडून विक्रम नावावार केला. आशियाई खंडात कसोटीत ९ वर्षानंतर इंग्लंडच्या फलंदाजाने १५० हून अधिक धावा केल्या. २०१५मध्ये एलिस्टर कूकने पाकिस्तानविरुद्ध अबुधाबीत २६३ धावा कुटल्या होत्या. पण, कुलदीपने ही विकेट मिळवली... कुलदीपने चेंडू थोडा बाहेरच्या दिशेने वळवला आणि डकेट त्यावर फकटा मारून झेलबाद झाला. डकेटने १५१ चंडूंत २३ चौकार व २ षटकारांसह १५३ धावांची विक्रमी खेळी केली.  डकेटने चौकार-षटकारांनी २५ चेंडूंत १०४ धावा कुटल्या. 

Web Title: India vs England 3rd Test Live Updates Day 3 -  Ben Duckett scored 153 runs (151) with 23 fours and 2 sixes, kuldeep yadav gets wicket, england 260/5 (50.1 Ov)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.