Join us  

कसोटी संघात निवड झाली, तरी भारताच्या ताफ्यात दाखल झाला नाही देवदत्त पडिक्कल

India vs England 3rd Test : भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:44 PM

Open in App

India vs England 3rd Test ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात मिळवलेला विजय हा संघाचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. विराट कोहली या संपूर्ण मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु आता लोकेश राहुलनेही ( KL Rahul) तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्याजागी कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal ) याची निवड जाहीर करण्यात आली. पण, पडिक्कल अजूनही भारतीय संघाच्या ताफ्यात दाखल झालेला नाही.

पहिल्या कसोटीनंतर दुखापतग्रस्त झालेल्या लोकेश राहुलने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. पण, तिसऱ्या कसोटीसाठी त्याची संघात निवड झाली, परंतु काल अचानक त्याच्या माघारीचे वृत्त समोर आले. BCCI च्या म्हणण्यानुसार लोकेस राहुल ९० टक्के तंदुरुस्त झाला आहे, परंतु त्याला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी आणखी आठवडा लागू शकतो. त्याच्या जागी रणजी करंडक स्पर्धा गाजवणाऱ्या देवदत्त पडिक्कलची निवड केली गेली. तामिळनाडू विरुद्धच्या सामन्यात देवदत्तने निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यासमोर १५१ धावांची वादळी खेळी केली.  

त्याने २१८ चेंडूंत १२ चौकार व ६ षटकारांसह १५१ धावा चोपल्या आणि त्यामुळे त्याची निवड झाली. यंदाच्या रणजी हंगामात त्याने ६ डावांत ९२.६७च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत आणि त्यात ३ शतकं आहेत. देवदत्तने २०२१ मध्ये भारताकडून पदार्पण केले होते आणि त्याने दोन ट्वेंटी-२० सामनेही खेळले, परंतु आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमधील फॉर्म त्याला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त राखता आला नाही. नंतर त्याच्या नावाचा पुन्हा विचार केला गेला नाही.  

पण, रणजी करंडक स्पर्धेच्या मागील दोन पर्वातील फॉर्मा पाहून त्याला कसोटी संघात बोलावणे आले. तिसऱ्या कसोटीत त्याची निवड होणे थोडे अवघडच आहे, कारण सर्फराज खान अजून प्रतीक्षेत आहे. संघात निवड होऊनही अद्याप देवदत्त भारताच्या ताफ्यात दाखल झालेला नाही. तामिळनाडूविरुद्धची मॅच सोमवारी संपली आणि देवदत्त त्यात खेळत होता. तो आज सायंकाळपर्यंत भारतीय संघात दाखल होण्याचे वृत्त आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडदेवदत्त पडिक्कललोकेश राहुल