Join us  

India vs England 2nd Test: आम्ही हरलो, पण लढलो... सांगतोय विराट कोहली, पाहा व्हिडीओ

आतापर्यंत आम्ही चांगला खेळ केला आहे. इंग्लंडला पहिल्या सामन्यात आम्ही कडवी झुंज दिली. इंग्लंडने आमच्यावर या मालिकेत कायम वरचष्मा राखला, असे झाले नाही. आम्हीदेखील इंग्लंडवर काही वेळा आघाडी घेतली होती. त्यांना पेचात पाडले होते. त्यांना आम्ही चांगले झुंजवले, असे कोहलीने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 8:39 PM

Open in App
ठळक मुद्देलॉर्ड्सची खेळपट्टी पाहिली तर ती स्पोर्टिंग असेल - कोहली

लंडन : भारताला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव जिव्हारी लागणारा होता, पण मानहानीकारक नक्कीच नव्हता. कारण या सामन्यात भारताने इंग्लंडला कडवी झुंज दिली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ही गोष्ट सर्वांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ' आम्ही हरलो, पण लढलो, ' असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.

लॉर्ड्स कसोटी सामन्यापूर्वी एका प्रश्नाचा उत्तर देताना कोहली म्हणाला की, " आतापर्यंत आम्ही चांगला खेळ केला आहे. इंग्लंडला पहिल्या सामन्यात आम्ही कडवी झुंज दिली. इंग्लंडने आमच्यावर या मालिकेत कायम वरचष्मा राखला, असे झाले नाही. आम्हीदेखील इंग्लंडवर काही वेळा आघाडी घेतली होती. त्यांना पेचात पाडले होते. त्यांना आम्ही चांगले झुंजवले. पण काही जण निकाल बघून बरेच काही बोलतात. पण आम्ही या सामन्यातून सकारात्मक संदेश घेतला आहे. या सामन्यातही आम्ही त्यांना चांगली झुंज देऊ. त्यामुळे या सामन्यातही आम्हाला विजयाची संधी असेल. "

लॉर्ड्सची खेळपट्टी स्पोर्टिंग असेललॉर्ड्सची खेळपट्टी पाहिली तर ती स्पोर्टिंग असेल असे मला वाटते. या खेळपट्टीवर पहिले काही दिवस वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. फलंदाजांनाही चांगल्या धावा करता येतील. कालांतराने फिरकीपटूंनाही ही खेळपट्टी पोषक ठरू शकते.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड