India vs England 2nd Test: येरे येरे पावसा... विराटसेना करतेय 'वरुणा'चा धावा

India vs England 2nd Test: इंग्लंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत पराभवापासून भारताला पाऊसच वाचवू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 03:48 PM2018-08-12T15:48:54+5:302018-08-12T15:50:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test: Virat kohli pray for rain | India vs England 2nd Test: येरे येरे पावसा... विराटसेना करतेय 'वरुणा'चा धावा

India vs England 2nd Test: येरे येरे पावसा... विराटसेना करतेय 'वरुणा'चा धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - इंग्लंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत पराभवापासून भारताला पाऊसच वाचवू शकतो. 4 बाद 89 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या इंग्लंड संघाला दडपणात आणण्याची संधी भारताने गमावली आणि त्यांच्यावर पराभवाचे ढग घोंगावू लागले आहेत. जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी करताना इंग्लंडला तिस-या दिवसअखेर 250 धावांची आघाडी मिळवून दिली आहे. 

(ख्रिस व्होक्सचे शतक, इंग्लंडची कसोटीवर मजबूत पकड)

भारताचा पहिला डाव 107 धावांत आटोपला होता आणि इंग्लंडच्या या आघाडीमुळे भारताला डावाने पराभव टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. लॉर्ड्सवरील कसोटीत पराभव झाल्यास पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-2 अशा पिछाडीवर जाईल आणि मग त्यांना मालिकेत पुनरागमन करणे अशक्यच होऊन बसेल. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीची सेना मनातल्या मनात  'वरुणा'चा धावा करत असेल. 

(India vs England 2nd Test: 'सुपरमॅन' दिनेश कार्तिक, सोशल मीडियावर प्रशंसा)

लॉर्ड्स कसोटीतील पहिल्या दिवसाप्रमाणे चौथ्या आणि पाचव्या दिवसाचा खेळ पावसाने वाया जावा अशी मनोमन इच्छा भारतीय चाहते करू लागले आहेत. जेणेकरून मालिकेत पुनरागमनाचे दरवाजे उघडे राहतील. रविवारी पावसामुळे खेळ वाया जाण्याची शक्यता धुसर असली तरी येथील हवामानाचा लहरी स्वभाव लक्षात घेता भारतीय संघ पावसाची आतुरतेने वाट पाहत असेल. लंडनच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार रविवारी येथे ढगांची चादर असेल आणि विश्रांती घेत पाऊस पडेल. हा अंदाज खरा ठरल्यास भारताला पराभव टाळण्यासाठी संघर्ष करावा लागेल.  

Web Title: India vs England 2nd Test: Virat kohli pray for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.