Join us  

India vs England, 2nd Test : रोहित शर्माचे खणखणीत शतक; ४८१ दिवसांचा दुष्काळ संपला 

रोहित शर्मानं ४८१ दिवसांनंतर कसोटीत शतक पूर्ण केले. ( Rohit Sharma Score first Hundred after 481 days) 

By स्वदेश घाणेकर | Published: February 13, 2021 1:29 PM

Open in App

India vs England, 2nd Test : अखेर हिटमॅन रोहित शर्माला ( Rohit Sharma) सूर गवसला.... चेन्नईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत रोहितनं खणखणीत शतक झळकावून टीम इंडियाच्या डावाला आकार दिला आहे. रोहित शर्मानं १३३ चेंडूंत शतक पूर्ण केलं. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे ७वे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्यानं चौथ्यांदा तिहेरी आकडा पार केला. इंग्लंडविरुद्धचे त्याचे हे पहिलेच शतक आहे. त्यानं ४८१ दिवसांनंतर कसोटीत शतक पूर्ण केले. ( Rohit Sharma Score first Hundred after 481 days) 

- रोहित शर्माला गेल्या ८ कसोटी सामन्यांमध्ये एकही शतक ठोकता आलेलं नव्हतं. रोहितनं ऑक्टोबर २०१९ मध्ये रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१२ धावांची खेळी साकारली होती.  दशकातील सर्वोत्तम चेंडू?; विराट कोहलीही स्तब्ध, रोहितला विचारलं खरंच OUT आहे का?,Video

- कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या ८ इनिंग्जमध्ये रोहितचा स्कोअर अनुक्रमे ६, २१, २६, ५२, ४४, ७, ६ आणि १२ असा राहिला आहे. यात रोहितने दोन वेळा बांगलादेश, दोन वेळा ऑस्ट्रेलिया आणि एकदा इंग्लंडविरुद्ध फलंदाजी केली आहे. 

-  गेल्या ४८१ दिवसांमध्ये रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक साकारता आलेलं नाही. रोहित शर्माने २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या कसोटी संघात पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये रोहितने शतकं ठोकली होती. 

- २०१३ साली पदार्पण केल्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर रोहितनं श्रीलंका विरुद्ध कसोटी शतक ठोकलं. त्यानंतरचं रोहितचं शकत पाहण्यासाठी दोन वर्षांची वाट पाहावी लागली. २०१३ सालापासून आतापर्यंत केवळ ६ कसोटी शतकं रोहितला करता आली आहेत. पिवळं जॅकेट, डोळ्यावर गॉगल; चेन्नई कसोटीत सर्वांचे लक्ष वेधणारी 'ती' कोण?

रोहितचे कसोटी शतकं ( Rohit Sharma's Test Hundreds)१७७ वि. वेस्ट इंडिज २०१३१११* वि. वेस्ट इंडिज २०१३१०२* वि. श्रीलंका २०१७१७६ वि. दक्षिण आफ्रिका २०१९१२७ वि. दक्षिण आफ्रिका २०१९२१२ वि. दक्षिण आफ्रिका २०१९

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मा