Join us  

रोहित शर्माचा 'शार्प' कॅच! आर अश्विनच्या फिरकीची कमाल, मोडला बी चंद्रशेखर यांचा विक्रम 

India vs England 2nd Test Live Update : इंग्लंडने आक्रमक खेळ करताना टीम  इंडियाचे टेंशन वाढवले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 10:46 AM

Open in App

India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : इंग्लंडने आक्रमक खेळ करताना टीम  इंडियाचे टेंशन वाढवले होते. पण, आर अश्विनने झटपट दोन विकेट्स घेऊन सामन्याला कलाटणी दिली. त्याने आधी ऑली पोपला माघारी पाठवले आणि रोहित शर्माने स्लीपमध्ये शार्प कॅच घेतला. त्यानंतर जो रूटचा फटका चूकल्याने तोही झेलबाद झाला. इंग्लंडचे ४ फलंदाज १५४ धावांवर माघारी परतले आहेत आणि त्यांना अजूनही २४५ धावा करायच्या आहेत. 

मोठी बातमी : शुबमन गिलला दुखापत, क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नाही आला, BCCI म्हणते... 

यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाने पहिल्या डावात, तर शुबमन गिलच्या शतकाने दुसऱ्या डावात भारताला सावरले. भारताच्या पहिल्या डावातील ३९६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गडगडला. जसप्रीत बुमराहने ६ विकेट्स घेत पाहुण्यांना हादरवून टाकले. इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवण्यात भारताला यश मिळाले आहे. झॅक्र क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून देताना अर्धशतकी भागीदारी केली. पण, तिसऱ्या दिवसअखेर आर अश्विनने ही जोडी तोडली आणि डकेत २८ धावांवर माघारी परतला. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या रेहान अहमदने चांगली फटकेबाजी केली. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही त्याने चांगले फटके खेचले. क्रॉलीसह त्याने ४५ धावा जोडल्या आणि रोहित शर्माने त्याला जीवदानही दिलं होतं. पण, अक्षर पटेलने त्याच षटकात रेहानला ( २३) पायचीत करून इंग्लंडला ९५ धावांवर दुसरा धक्का दिला.  क्रॉलीने पदलालित्य दाखवताना अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर चौकार खेचून अर्धशतक ( ८३ चेंडू) पूर्ण केले. ऑला पोप व क्रॉली हे बिनधास्त खेळ करत होते आणि भारताकडे संधीची वाट पाहण्यापलीकडे दुसरा पर्याय दिसत नव्हता. अँड्य्रू स्ट्रॉस ( चेन्नई, २००८) याच्यानंतर भारतात कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा क्रॉली इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला. अश्विनने भारताला मोठं यश मिळवून देताना पोपला ( २३) रोहितकरवी झेलबाद केले. दुखापत असूनही मैदानावर उतरलेल्या जो रूटने आल्या आल्या दोन रिव्हर्स स्वीपवर चौकार मिळवले. त्याचीही विकेट अश्विनने घेतली. इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक ९७ विकेट्स घेण्याचा भारतीय गोलंदाजाचा विक्रम अश्विनने नावावर केला. त्याने बी चंद्रशेखर ( ९५) यांचा विक्रम मोडला.  

    

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनजो रूटरोहित शर्मा