इंग्लंडला धक्का; प्रमुख खेळाडूने तातडीने सोडाले मैदान, परत खेळायला येईल याची गॅरंटी नाही

India vs England 2nd Test Live Update : फॉर्माशी झगडणाऱ्या शुबमन गिलने शतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 01:02 PM2024-02-04T13:02:03+5:302024-02-04T13:02:20+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live Update : Joe Root sustained an external blow to his right little finger, attempting a slip catch in the first session of D3, there is no indication of when he will return to the field.   | इंग्लंडला धक्का; प्रमुख खेळाडूने तातडीने सोडाले मैदान, परत खेळायला येईल याची गॅरंटी नाही

इंग्लंडला धक्का; प्रमुख खेळाडूने तातडीने सोडाले मैदान, परत खेळायला येईल याची गॅरंटी नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Live Update : फॉर्माशी झगडणाऱ्या शुबमन गिलने शतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे... आधी श्रेयस अय्यरसोबत आणि आता अक्षर पटेलसोबत दमदार भागीदारी करून गिलने इंग्लंडची अवस्था वाईट केली आहे. भारताने तीनशेपार धावांची आघाडी घेऊन इंग्लंडची अडचण वाढवली आहे. त्यात आणखी एक भर पडली आहे. इंग्लंडचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज जखमी झाला असून त्याने मैदान सोडले आहे. 

२२ मीटर पळून बेन स्टोक्सने अविश्वसनीय झेल घेताच प्रेक्षकांना दाखवलं बोट, Video Viral 

भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले.  १४३ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तीन षटकांत ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने धक्के दिले. कर्णधार रोहित शर्मा (१३) अँडरसनच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अँडरसनने यशस्वी जैस्वालला ( १७)  स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. शुबमनने दोन जीवदान मिळाल्यानंतर खेळपट्टीवर जम बसवत त्याने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसोबत ११२ चेंडूंत ८१ धावा जोडल्या. टॉम हार्टलीने ही भागीदारी तोडली आणि बेन स्टोक्सने अप्रतिम झेल घेत अय्यरला २९ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. बेन फोक्सने यष्टींमागे रजत पाटीदारचा चांगला झेल त्याने टिपला.  
 


भारताने लंच ब्रेकपर्यंत २७३ धावांची आघाडी घेतली... इंग्लंडने भारतात चौथ्या डावात सर्वाधिक ५ बाद २४१ धावा केल्या आहेत आणि १९६४ साली चेन्नईत खेळलेली ती कसोटी ड्रॉ राहिली होती. त्यामुळे इंग्लंडला विशाखापट्टणम कसोटी अवघड जाईल हे निश्चित आहे. गिल व अक्षर पटेल यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना भारताला तीनशेपार आघाडी मिळवून दिली. दरम्यान, इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रूट याला स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली. इंग्लंडच्या वैद्यकिय टीमने त्याला त्वरीत मैदानाबाहेर नेले आणि तो पुन्हा कधी मैदानावर येईल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.  

Web Title: India vs England 2nd Test Live Update : Joe Root sustained an external blow to his right little finger, attempting a slip catch in the first session of D3, there is no indication of when he will return to the field.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.