DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out

आकाश दीपनं सेट झालेली ही जोडी फोडली. मग मोहम्मद सिराजनं तळाच्या फलंदाजीला सुरुंग लावला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 22:12 IST2025-07-04T22:11:00+5:302025-07-04T22:12:26+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Day 3 ENG 407 All Out IND Takes 180 Run Lead Siraj Takes Six Wicket Haul Akash Deep Take 4 Wickets | DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out

DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Day 3 ENG 407 All Out IND Takes 180 Run Lead : मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाला ४०७ धावांवर रोखले आहे. यासह भारतीय संघाने या सामन्यात १८० धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. सिराज-आकाश दीप जोडीनं अवघ्या ८४ धावांवर इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला होता. त्यानंतर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी त्रिशतकी भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. आकाश दीपनं सेट झालेली ही जोडी फोडली. मग मोहम्मद सिराजनं तळाच्या फलंदाजीला सुरुंग लावला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

हॅरी ब्रूक-जेमी स्मिथनं सावरला डाव, आकाश दीपनं फोडली सेट झालेली जोडी

तिसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्याच सत्रात टीम इंडियानं इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला होता. पण त्यानंतर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक दोघांनी दीड शतकी खेळीसह सहाव्या विकेटसाठी ३०३ धावांची दमदार भागीदारी रचली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरली. नवा चेंडू येताच आकाश दीपनं हॅरी ब्रूकच्या रुपात टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. त्याने २२३४ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १५८ धावांचे योगदान दिले. ३८७ धावांवर इंग्लंडच्या संघाला सहावा धक्का बसला. या विकेटसह आकाश दीपनं आपल्या खात्यात चौथी विकेट जमा केली. 

स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

तळाच्या फलंदाजीला सुरुंग लावत सिराजनं मारला 'सिक्सर'

इंग्लंडची सेट झालेली जोडी फुटल्यावर सिराजनं इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिले नाही. उर्वरित सर्व चार विकेट्स घेत सिराजनं इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट्स घेण्याचा डाव साधला. यजमान संघाने अवघ्या २० धावात अखेरच्या ४ विकेट्स गमावल्या. इंग्लंडच्या संघाकडून जेमी स्मिथ एका बाजूला शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने २०७ चेंडूत  २१ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १८४ धावांची खेळी केली.

Web Title: India vs England 2nd Test Day 3 ENG 407 All Out IND Takes 180 Run Lead Siraj Takes Six Wicket Haul Akash Deep Take 4 Wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.