Join us  

India Vs England 2018 : विराटला रोखण्यासाठी निवृत्त शिलेदाराला संघात घेणार इंग्लंड?

तिस-या वन डे सामन्यात आदिल रशीदच्या अप्रतिम चेंडूवर भारताचा कर्णधार विराट कोहली त्रिफळाचीत झाला होता. कोहलीनेही रशीदच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. कोहलीला दिलासा देणारी बाब म्हणजे रशीद कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाचा भाग नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 3:01 PM

Open in App

लंडन -  तिस-या वन डे सामन्यात आदिल रशीदच्या अप्रतिम चेंडूवर भारताचा कर्णधार विराट कोहली त्रिफळाचीत झाला होता. रशीदने टाकलेल्या चेंडूचा अंदाज बांधण्यात कोहली अपयशी ठरला आणि त्या चेंडूने स्टम्प्सचा वेध घेतला. कोहलीनेही रशीदच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. कोहलीला दिलासा देणारी बाब म्हणजे रशीद कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाचा भाग नाही. मात्र, इंग्लंडचे राष्ट्रीय निवड समिती प्रमुख एड स्मिथ यांनी पाच दिवसांच्या क्रिकेट स्पर्धेत खेळावे यासाठी या फिरकीपटूबरोबर चर्चा सुरू केली आहे. स्पोर्टमेलने दिलेल्या माहितीनुसार रशीदने कसोटी मालिकेत खेळावे यासाठी स्मिथ त्याच्याशी चर्चा करत आहेत. मर्यादित षटकांच्या मालिकेत रशीद भारतीय फलंदाजांची डोकेदुखी ठरला होता. यावर्षी रशीदने फेब्रुवारी महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यापाठोपाठ अॅलेक्स हेल्स आणि रिस टॉपली यांनीही कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. जोस बटलरनेही कसोटीतून निवृत्तीचा विचार केला होता, परंतु पाकिस्तानविरूद्घच्या कसोटी मालिकेत त्याला संघात संधी मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेले नाही. सध्याच्या घडीला इंग्लंडकडे अनुभवी फिरकीपटू नाही आणि जर रशीदने खेळल्याचे मान्य केल्यास इंग्लंडच्या खेळाडूंचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. रशीदने कसोटीत परतण्याचे मान्य न केल्यास निवड समितीने डोम बेस आणि जॅक लीच यांचा पर्याय ठेवला आहे. रशीदने 10 कसोटी सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 166 प्रथम श्रेणी सामन्यांत 490 बळी टिपले आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीक्रिकेटक्रीडा