India vs England, 1st Test : वेदनेने विव्हळत होता जो रूट अन् विराट कोहलीनं दाखवलं Spirit Of Cricket, Video 

India vs England, 1st Test : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 5, 2021 05:30 PM2021-02-05T17:30:18+5:302021-02-05T17:33:48+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 1st Test :  Virat Kohli to the rescue as Joe Root goes down with cramp, watch Video | India vs England, 1st Test : वेदनेने विव्हळत होता जो रूट अन् विराट कोहलीनं दाखवलं Spirit Of Cricket, Video 

India vs England, 1st Test : वेदनेने विव्हळत होता जो रूट अन् विराट कोहलीनं दाखवलं Spirit Of Cricket, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपहिल्या सत्रात आर अश्विन व जसप्रीत बुमराह यांनी इंग्लंडला दिलेले धक्केजो रूट व डॉम सिब्ली यांनी त्यानंतर दमदार खेळ करताना पुनरागमन केलेरूट-सिब्ली जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ३९० चेंडूंत २०० धावांची भागीदारी केली

India vs England, 1st Test : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. डॉम सिब्ली ( Dom Sibley) आणि रोरी बर्न्स ( Rory Burns) यांनी इंग्लंडला आश्वासक सुरूवात करून दिली. श्रीलंका दौरा गाजवणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं भारतीय गोलंदाजांना दमवलं. रुटचे खणखणीत शतक व सिब्लीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसात इंग्लडनं ३ बाद २६३ धावा केल्या. दिवसाच्या अखेरच्या षटकात जसप्रीत बुमरानं सिब्लीला ( ८७) माघारी पाठवले. रुट १२८ धावांवर नाबाद आहे. शतकी खेळी करणारा जो रूट सामन्यात वेदनेनं विव्हळत होता आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्याच्या मदतीला धावला. 

राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत नेट्समध्ये सराव करणाऱ्य़ा शाहबाज नदीमला ( Shahbaz Nadeem) अचानक Playing XI मध्ये संधी देत कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितील कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) न खेळवण्याचा पर्याय कोहलीकडे होता. पण, त्यानं कुलदीपला डावलल्यानं सर्वांनी टीका केली.  १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं रचला इतिहास; भारतीय गोलंदाजांची केली धुलाई 

१७ कसोटी व ७९ विकेट्सनंतर मायदेशात पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली असती, परंतु रिषभ पंतनं ( Rishabh Pant) झेल सोडला. इंग्लंडचे सलामीवीर डॉम सिब्ली ( Dom Sibley) आणि रोरी बर्न्स ( Rory Burns) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. पण, आर अश्विननं बर्न्सला माघारी पाठवले, त्यानतंर बुमराहनं डॅन लॉरेन्स ( ०) याला पायचीत केले आणि पहिल्या सत्रात इंग्लंडची अवस्था २ बाद ६७ अशी झाली जो रुट व डॉम सिब्ली यांनी द्विशतकी भागीदारी करताना वर्चस्व गाजवले.  ICC World Test Championships scenarios: टीम इंडिया कशी करू शकते अंतिम फेरीत प्रवेश?; इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनाही संधी

जो रुट व डॉम सिब्ली यांनी तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतात भारताविरुद्ध केलेली ही दुसरी द्विशतकी भागीदारी आहे. यापूर्वी २०१२मध्ये जॉनथन ट्रॉट व इयान बेन यांनी चौथ्या विकेटसाठी दोनशे धावा जोडल्या होत्या.  सामन्यादरम्यान विराटनं खिलाडूवृत्ती दाखवली. वेदनेनं विव्हळत असलेल्या पायात क्रॅम्प आला आणि तो मैदानावर बसला. वैद्यकीय टीम येईपर्यंत विराटनं त्याला प्राथमिक उपचार दिले. जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू अन् रिषभ पंतकडून सुटला झेल

पाहा व्हिडीओ...


 

Web Title: India vs England, 1st Test :  Virat Kohli to the rescue as Joe Root goes down with cramp, watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.