Join us  

India vs England, 1st Test : इंग्लंडच्या संघावर झाला अन्याय, Ajinkya Rahaneला दिलं नाबाद; ग्लेन मॅक्सवेल चिडला!

India vs England, 1st Test Day 1; TV umpire howler deprives Jack Leach of Ajinkya Rahane wicket :  चेन्नईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या अम्पायरनं इंग्लंडच्या संघावर अन्याय केला

By स्वदेश घाणेकर | Published: February 13, 2021 5:59 PM

Open in App

India vs England, 1st Test Day 1 :  चेन्नईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या अम्पायरनं इंग्लंडच्या संघावर अन्याय केला. सामन्याच्या अखेरच्या सत्रातील तिसऱ्या अम्पायरनं दिलेल्या दोन निर्णयांवर आता चर्चा रंगू लागली आहे. पहिल्यांदा रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला स्टम्पिंग आऊट न देण्याच्या निर्णयावर आणि दुसऱ्यांदा अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याला बाद करण्यासाठी घेतलेला DRSवरील निकाल इंग्लंडच्या विरोधात गेल्यानं सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दुसऱ्या कसोटीत अनिल चौधरी (Anil Chaudhary) तिसऱ्या अम्पायरची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तटस्थ अम्पायरची मागणी जोर धरत आहे. (  TV umpire howler deprives Jack Leach of Ajinkya Rahane wicket)  मुंबईकरांची चेन्नईत 'खडूस' खेळी, पहिल्या दिवसावर टीम इंडियाची पकड

जॅक लिचनं टाकलेल्या ७१व्या षटकात रोहितसाठी स्टम्पिंगची अपिल केले गेले. तेव्हा रिप्लेत चेंडू रोहितच्या बॅटला लागून यष्टिरक्षकाच्या हातात गेल्याचे दिसले. पण, यष्टिरक्षकानं त्वरित स्टम्पिंग करून अपिल केले. रोहितचा पाय क्रिजवर असल्यानं तिसऱ्या अम्पायरनं त्याला नाबाद दिले. नियमानुसार फलंदाजाचा पाय किंवा बॅटीचा काही भाग क्रिज लाईनच्या आत असणे गरजेचे आहे. रोहितचा पाय लाईनवरच होता आणि तिसऱ्या अम्पायर अनिल चौधरी यांनी त्याचा पाय लाईनिच्या आत असल्याचे सांगत त्याला नाबाद दिले. अनेकांच्या मते रोहित बाद होता. जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं; हा विक्रम कुणाला जमणार पण नाही! तीन षटकानंतर लिचच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा तिसऱ्या अम्पायरनं चुकीचा निर्णय दिला. ७५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अजिंक्यविरोधात अपिल केलं गेलं. मैदानावरील अम्पायर अरविंद शर्मा यांनी त्याला नाबाद दिले आणि कर्णधार जो रुटनं DRS घेतला. पहिल्या रिप्लेत चेंडू बॅटला टच न झाल्याचे दिसत होते आणि त्यामुळे कॅचचं अपिल फेटाळण्यात आले. त्यानंतर LBW आहे का हेही तपासले गेले. त्यातही चेंडू स्टम्पवर आदळत नसल्याचे दिसले. पण, हा चेंडू अजिंक्यच्या ग्लोजला लागल्याचे इंग्लंड संघाचे म्हणणे होते.  रोहित शर्माचं शतक अन् सोशल मीडियावर चर्चा रितिकाची, Video पाहिल्यावर समजेल कारण!   अम्पायरच्या या चुकांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यानंही ट्विट करून नाराजी व्यक्त केली.   दरम्यान, जेम्स अँडरसनला विश्रांती देणं इंग्लंडच्या संघाला महागात पडलं. शुबमन गिल व विराट कोहली शून्यावर माघारी परतले असले तरी रोहित शर्मानं ( Rohit Sharma) आज इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांनीही त्याला चांगली साथ दिली. पुजारा मोठी खेळी करू शकला नसला तरी संघ अडचणीत असताना तो रोहित सोबत उभा राहिला. अजिंक्यनंही अर्धशतक झळकावताना टीम इंडियाच्या धावांत भर घातली. टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ६ बाद ३०० धावा केल्या. रोहित २३१ चेंडूंत १८ चौकार व २ षटकारांसह १६१ धावांवर माघारी परतला.  रिषभ पंतनं अखेरच्या काही षटकांत दमदार फटकेबाजी केली.  दशकातील सर्वोत्तम चेंडू?; विराट कोहलीही स्तब्ध, रोहितला विचारलं खरंच OUT आहे का?,Video

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअजिंक्य रहाणेरोहित शर्मा