India vs England 1st Test Live : टीम इंडियाकडून १४ वर्षांनंतर इंग्लंडचं कापलं गेलं नाक; ४५ धावांत पडल्या ७ विकेट्स अन् गडगडला डाव!

india vs England 2021 1st test match live cricket score : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय टीम इंडियाच्या पथ्यावर पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:56 PM2021-08-04T21:56:26+5:302021-08-04T21:59:42+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test Live: From 138-3 to 183-10, England lost the last 7 wickets for just 45 runs in the first innings with 4 wickets for Bumrah, 3 wickets for Shami and 2 wickets for Thakur | India vs England 1st Test Live : टीम इंडियाकडून १४ वर्षांनंतर इंग्लंडचं कापलं गेलं नाक; ४५ धावांत पडल्या ७ विकेट्स अन् गडगडला डाव!

India vs England 1st Test Live : टीम इंडियाकडून १४ वर्षांनंतर इंग्लंडचं कापलं गेलं नाक; ४५ धावांत पडल्या ७ विकेट्स अन् गडगडला डाव!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देजसप्रीत बुमराहनं चार, मोहम्मद शमीनं ३ व शार्दूल ठाकूरनं दोन विकेट्स घेतल्या

india vs England 2021 1st test match live cricket score : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय टीम इंडियाच्या पथ्यावर पडला. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना इंग्लंडला पहिल्या डावात दोनशेपारही जाऊ दिले नाही. कर्णधार जो रूट वगळल्यास इंग्लंडचे अन्य फलंदाज भारतासमोर नांगी टेकून माघारी परतले. जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचला आहे आणि आता फलंदाजांच्या कामगिरीवर सामन्याचा निकाल अवलंबून आहे. 

भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅम येथे सुरू झाला अन् भारतानं पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या दोन फलंदाजांना ६२ धावांवर माघारी पाठवले. आर अश्विन आणि इशांत शर्मा या दोन प्रमुख गोलंदाजाशिवाय टीम इंडिया मैदानावर उतरल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात त्यांना धक्का दिला. रोरी बर्न्स पाचव्याच चेंडूवर पायचीत होऊन भोपळ्यावर माघारी परतला. त्यानं डॉम सिब्ली व झॅक क्रॅवली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. India vs England 1st Test Live, India vs England 1st Test


इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद सिराजनं त्याची विकेट घेतली.  क्रॅवलीला २७ धावांवर माघारी जावं लागलं. मोहम्मद शमीनं तिसरी विकेट घेताना डॉम सिब्लीला ( १८) बाद केले. त्यानंतर कर्णधार जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या डावाला आकार दिला. रूटनं अर्धशतक पूर्ण करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना झुंजवले. इंग्लंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रमही त्यानं नावावर केला. Most runs for England in Intl cricket. रूटच्या नावावर १५७३९* धावा झाल्या आहेत. त्यान अॅलिस्टर कूक ( १५७३७), केव्हीन पीटरसन ( १३७७९) व इयान बेल ( १३३३१) यांचा विक्रम मोडला.  Ind vs Eng 1st Test live, Eng vs ind 1st test live score


टी ब्रेकनंतर शमीनं पहिल्याच चेंडूवर डॅन लॉरेन्सला ( ०) बाद करून इंग्लंडची अवस्था ५ बाद १३८ अशी दयनीय केली. जो रूट एकटा संघर्ष करत होता. जोस बटलरही ( ०) जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर विराटनं गोलंदाजीसाठी शार्दूल ठाकूरला पाचारण केलं अन् त्यानं त्या षटकात दोन धक्के दिले. जो रूटला पायचीत केल्यानंतर चौथ्या चेंडूवर ऑली रॉबिन्सन ( ०) सहज झेलबाद झाला. रुटनं १०८ चेंडूंत ११ चौकारांसह ६४ धावा केल्या. इंग्लंडचे ८ फलंदाज १५५ धावांवर तंबूत परतले होते. बुमराहनं आणखी एक विकेट घेताना स्टुअर्ट ब्रॉडला बाद केले. ( 183 all out - England's lowest total vs India at home in a match's first innings) 


२००७मध्ये ट्रेंट ब्रिज येथेच भारतीय संघानं इंग्लंडचा पहिला डाव १९८ धावांवर गुंडाळला होता अन् भारतानं तो सामना ७ विकेट्सनं जिंकला होता. ( 198/10 - England's lowest total at home batting 1st against India. Also at Trent Bridge in 2007.  Ind won by 7 wkts!) सॅम कुरननं फटकेबाजी करताना नाबाद २७ धावा काढल्या. बुमराहनं इंग्लंडची अखेरची विकेट घेतली. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गडगडला. जसप्रीत बुमराहनं चार, मोहम्मद शमीनं ३ व शार्दूल ठाकूरनं दोन विकेट्स घेतल्या 

Web Title: India vs England 1st Test Live: From 138-3 to 183-10, England lost the last 7 wickets for just 45 runs in the first innings with 4 wickets for Bumrah, 3 wickets for Shami and 2 wickets for Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.