Join us  

India Vs Bangladesh, Latest News : आज्जीबाईंनी रोहित आणि कोहलीच्या कानात काय सांगितलं, जाणून घ्या...

या गोष्टीचा खुलासा दस्तुरखुद्द चारुलता यांनीच सामन्यानंतर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 9:17 PM

Open in App

बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : भारताने बांगलादेशवर विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. या सामन्यामध्ये साऱ्यांचे लक्ष वेधून घेतेले ते 87 वर्षीय चारुलता पटेल यांनी. या सामन्यातनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी चारुलता यांची भेट घेतली. यावेळी चारुलता यांनी या दोघांनाही एक अतुलनीय गोष्ट दिली. या गोष्टीचा खुलासा दस्तुरखुद्द चारुलता यांनीच सामन्यानंतर केला आहे.

विजयानंतर सामनावीर रोहित शर्मा चारुलता यांना भेटला. त्यानंतर कोहली तर बराच काळ त्यांच्याशी गप्पा मारत होती. यावेळी चारुलता यांनी एक खास गोष्ट या दोघांच्या कानात सांगितली. चारुलता या दोघांना म्हणाल्या की, "  माझे आशिर्वाद तुझ्याबरोबर आहेत, बेटा असाच खेळत राहा."

आज्जीबाईंचा 'आनंद' होणार द्विगुणित; कारण विश्वचषकाचे मिळणार फुकट तिकीटबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने बाजी मारली खरी, पण या लढतीत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते 87 वर्षीय चारुलता पटेल या आज्जीबाईंनी. या आज्जीबाई व्हिलचेअरवरून सामना पाहायला आल्या होत्या. सामना संपल्यावर या आज्जीबाईंची कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी स्पेशल भेट घेतली. यावेळी आज्जीबाईंनी या दोघांनाही आर्शिवादही दिले. पण या आज्जीबाईंसाठी आता एक खूष खबर आहे. कारण यापुढे चारुलता ज्या भारताच्या विश्वचषकातील लढती पाहणार आहेत, त्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचा 'आनंद' द्विगुणित होणार असून आता त्यांना सामन्याचे तिकीट फुकटच मिळणार आहे.

भारत आणि बांगालादेश यांच्यातील सामन्यात चारुलता यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. भारतातील उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही चारुलता यांना मैदानात पाहिले. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक घोषणा केली आहे. आपल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, " चारुलता यांना इंग्लंडमध्ये शोधा. कारण यापुढे विश्वचषकात भारताचे जे सामने होतील, त्या सामन्यांच्या तिकिटांचे पैसे मी त्यांना देणार आहे."

आत्ता वर्ल्ड कप भारताचाच, आज्जीबाईंचा कोहलीला आशिर्वाद, व्हिडीओ वायरलएखादी गोष्ट फक्त गुणवत्तेवरच जिंकता येत नाही. बऱ्याचदा सदिच्छा, आशिर्वादही तुमच्या यशाचे रहस्य ठरू शकतात. असाच आशिर्वाद भारताचा कर्णधार विराट कोहलीला मिळाला. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या चारुलता पटेल या 87 वर्षांचा आज्जीबाई आल्या होत्या. चारुलता यांनी यावेळी कोहली आणि सामनावीर रोहित शर्माशी गप्पा मारल्या. त्याचबरोबर त्यांना आशिर्वादही दिला.सामनावीर रोहित शर्माने केला 'सुपर फॅन'बरोबर आनंद साजराबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावले. विश्वचषकातील त्याचे हे चौथे शतक ठरले. भारताच्या विजयात रोहितने मोलाचा वाटा उचलला आणि त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोहितने आपला आनंद यावेळी स्पेशल फॅन'बरोबर साजरा केला.

हा सामना पाहायला 87 वर्षांच्या चारुलता पटेल आल्या होत्या. चारुलता या व्हिलचेअरवरून सामना पाहायला आल्या होत्या. सामना सुरु असताना चारुलता यांनी सामन्याचा मनोसोक्त आनंद लुटला. पण सामना संपल्यावर रोहित खासकरून चारुलता यांच्याकडे गेला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. यापुढील लॉर्ड्स येथील सामना सामना पाहण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे चारुलता यांनी यावेळी सांगितले.

भारताच्या सामन्यात 'या' आज्जीबाईंनी केली फुल टू धमाल, पाहा व्हिडीओबांगलादेशवर विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पण या सामन्यात साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते एका भाराताच्या आज्जीबाईंनी. या आज्जीबाईंनी सामन्यात फुल टू धमाल केल्याचे पाहायला मिळाले. या आज्जीबाईंचे सामन्यातील व्हिडीओ चांगलेच वायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

रोहित शर्माचे शतक आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशला 28 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण या सामन्या या आज्जीबाईंनी सर्वांची मने जिंकली. भारताच्या खेळाडूंनाही या आज्जीबाईंना भेटायचा मोह आवरता आला नाही. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि या लढतीतील सामनावीर रोहित शर्मा यांनीही या आज्जीबाईंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.

या आज्जीबाई नेमक्या आहेत तरी कोण...या आज्जीबाईंचे नाव चारुलता पटेल असून त्या 87 वर्षांचा आहेत. या आज्जीबाई सामना पाहायला व्हिलचेअरवर आल्या होत्या. पण या आज्जीबाईंनी जी सामन्यात धमाल केली, तेवढा आनंद कुणालाही लुटता आला नाही.

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहली