India Vs Bangladesh, Latest News : भारताला मोठा धक्का, जसप्रीत बुमरा दुखापतग्रस्त 

हार्दिक पंड्याच्या 36व्या षटकात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना बुमराला दुखापत झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 10:19 PM2019-07-02T22:19:30+5:302019-07-02T22:19:55+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh, Latest News: Jaspreet Bumrah injured during the match | India Vs Bangladesh, Latest News : भारताला मोठा धक्का, जसप्रीत बुमरा दुखापतग्रस्त 

India Vs Bangladesh, Latest News : भारताला मोठा धक्का, जसप्रीत बुमरा दुखापतग्रस्त 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताला जसप्रीत बुमाराच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. या सामन्यातील हार्दिक पंड्याच्या 36व्या षटकात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना बुमराला दुखापत झाली आहे.

सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना बुमरा चौकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील होता. पण बुमराला चौकार रोखता आला नाही. पण यावेळी क्षेत्ररक्षण करताना बुमराच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे बुमराला मैदानाबाहेर जावे लागले.

धोनी नसताना रीव्ह्यू घेतला आणि वाया गेला
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने एक रीव्ह्यू घेतला. पण हा रीव्ह्यू घेताना महेंद्रसिंग धोनी यष्टीरक्षण करत नव्हता. धोनी नसताना यावेळी कर्णधार विराट कोहलीने रिषभ पंतचे ऐकून रीव्ह्यू घेतला. पण हा भारताचा रीव्ह्यू वाया गेल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रीव्ह्यू न घेतल्याने जेसन रॉयला जीवदान मिळाले होते.

ही गोष्ट घडली ती 12व्या षटकात. यावेळी मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. शमीचा एक चेंडू सौम्य सरकारच्या पॅडवर आदळला. त्यावेळी शमीसह भारतीय संघाने जोरदार अपील केले. पण मैदानावरील पंचांनी यावेळी सरकारला नाबाद ठरवले. त्यावेळी कोहलीने पंतला रीव्ह्यू घ्यायचा की नाही, याबाबत विचारले. त्यावेळी मला काहीच समजले नाही, असे उत्तर पंतने दिले. पण त्यावेळी हा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचेही पंतने कोहलीला सांगतिले नाही. त्यामुळे कोहलीने रीव्ह्यू घेतला आणि यामध्ये तो नापास झाल्याचे पाहायला मिळाले.

जेसन रॉय बाद होता, पण कोहलीनं DRS घेतला नाही
जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला सकारात्मक सुरुवात करून दिली. दुखापतीतून सावरणाऱ्या रॉयनं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, शिवाय त्याला नशीबाचीही  साथ मिळाली. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्यानं टाकलेल्या 11 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉयला जीवदान मिळालं. रॉय व बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रॉय बाद असल्याची अपील भारतीय खेळाडूंनी केली, परंतु त्यावर DRS न मागितल्याचा फटका भारताला बसला.

पांड्यानं टाकलेला चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला, परंतु त्याला छेडछाड करण्याचा मोह रॉयला आवरता आला नाही. चेंडू त्याच्या ग्लोव्हजला घासून यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हातात विसावला. धोनीनं त्वरित अपील केले, परंतु पंचांनी व्हाईडचा सिग्नल दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व पांड्या धोनीकडे आले. पण, धोनीनं DRS न घेण्यास सांगितले. त्यानंतर रिप्लेत पाहिले असता रॉय बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते, त्यामुळे DRS चा निर्णय घेतला असता तर भारताला पहिले यश मिळाले असते, असे चाहत्यांना वाटले.

Web Title: India vs Bangladesh, Latest News: Jaspreet Bumrah injured during the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.