Join us  

India vs Australia : मैदानावर न उतरताही रोहित शर्मानं टीम इंडियाकडून नोंदवला भारी विक्रम

टीम इंडियाला वन डे मालिकेत रोहितची उणीव प्रकर्षाने जाणवली असेलच. या दौऱ्यावर वन डे मालिकेत रोहित मैदानावर उतरला नसला तरी त्यानं एक भारी विक्रम नावावर केला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 03, 2020 12:15 PM

Open in App
ठळक मुद्देरोहित शर्माचा वन डे व ट्वेंटी-20 संघात समावेश नाही, कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात येणारदुखापतीतून सावरण्यासाठी रोहित शर्मा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाच्या ताफ्यात रोहित शर्माच्या नावाचा समावेश न केला गेल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यात पहिल्या दोन वन डे सामन्यात टीम इंडियावर ओढावलेली पराभवाची नामुष्की पाहून नेटिझन्सही रोहित असता तर अशी अवस्था झाली नसती, हे मत व्यक्त केले. टीम इंडियाला वन डे मालिकेत रोहितची उणीव प्रकर्षाने जाणवली असेलच. या दौऱ्यावर वन डे मालिकेत रोहित मैदानावर उतरला नसला तरी त्यानं एक भारी विक्रम नावावर केला आहे. टीम इंडियासाठी वन डे क्रिकेटमध्ये रोहितच भारी खेळाडू असल्याचे या विक्रमातून पुन्हा एकदा दिसेल.

रोहितनं सलग आठव्या वर्षी ( कॅलेंडर वर्षात) टीम इंडियाकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूचा मान पटकावला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हार्दिक पांड्याची ९२ धावांची खेळी ही टीम इंडियाकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. २०२०मध्येही रोहितनं १९ जानेवारीला बंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली ११९ धावांची खेळी ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. 

रोहित शर्माची सर्वोत्तम खेळी ( Rohit Sharma’s 8-year-long streak in ODIs ) 2013 – 2092014 – 2642015 – 1502016 – 171*2017 – 208*2018 – 1522019 – 1592020 – 119

विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात भारी विक्रम, जगात ठरला अव्वलवन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२००० धावांचा विक्रम विराटनं नावावर केला. त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटनं २५१ व्या वन डे सामन्यात १२ हजार धावा पूर्ण केल्या. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ हजार धावांचा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिननं ३०९ वन डेत ३०० डावांमध्ये हा पल्ला पार केला होता. कोहलीनं ५८ सामन्यांपूर्वी हा पल्ला पार केला.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १२ हजार धावा करणारे फलंदाज - विराट कोहली ( २५१ सामने व २४२ डाव), सचिन तेंडुलकर ( ३०९ सामने व ३०० डाव), रिकी पाँटिंग ( ३२३ सामने व ३१४ डाव ), कुमार संगकारा ( ३५९ सामने व ३३६ डाव), सनथ जयसूर्या ( ३९० सामने व ३७९ डाव), महेला जयवर्धने ( ४२६ सामने व ३९९ डाव)

११ वर्षांत प्रथमच विराट कोहलीवर ओढावली नामुष्कीकॅलेंडर वर्षात २००९नंतर प्रथच विराटला वन डे क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. वन डे क्रिकेटमधील पदार्पणानंतर दुसऱ्यांदा कॅलेंडर वर्षात विराट शतक झळकावण्यात अयपशी ठरला आहे. विराटनं १४ ऑगस्ट २०१९मध्ये अखेरचे वन डे शतक झळकावले आहे. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध ९९ चेंडूंत नाबाद ११४ धावा केल्या होत्या.  

विराट कोहलीची वन डे क्रिकेटमधील ( शतक) कॅलेंडर वर्षातील कामगिरी 2008 - 0 2009 - 1 2010 - 32011 - 42012 - 52013 - 42014 - 42015 - 22016 - 32017 - 62018 - 62019 - 5 2020 - 0 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया