Join us  

India vs Australia : भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना रवी शास्त्री काय करत होते ते पाहा, Photo Viral

India vs Australia, 2nd ODI : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीची चिरफाड केली.

By स्वदेश घाणेकर | Published: November 29, 2020 2:02 PM

Open in App

India vs Australia, 2nd ODI : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीची चिरफाड केली. अॅरोन फिंच ( Aaron Finch ) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) या जोडीनं पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून देताना मजबूत पाया रचला. त्यावर स्टीव्हन स्मिथ ( Steve Smith) आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकी भागीदारी करून धावांचा डोंगर उभा केला. त्यात ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी म्हणजे सोने पे सुहागा....

वॉर्नर-फिंच जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. फिंचनं ६९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. फिंच व वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४२ धावांचा भक्कम पाया रचला. त्यानंतर वॉर्नर ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ८३ धावा करून धावबाद होत माघारी परतला. स्मिथ व लाबुशेन यांनी मधल्या षटकांत केलेली खेळी मंत्रमुग्ध करणारी ठरली. क्षेत्ररक्षण लांब असताना गॅप काढून कसे चौकार मारायचे, हे स्मिथनं आज शिकवले. त्यानं पुन्हा ६२ चेंडूंत शतक पूर्ण केलं. पण,  ६४ चेंडूंत १४ चौकार व २ षटकार खेचून तो १०४ धावांवर बाद झाला.  

ग्लेन मॅक्सवेलची चौकार-षटकाराच्या आतषबाजीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणखी हतबल केलं. कशीही गोलंदाजी करा मॅक्सवेलनं अतरंगी फटक्यानं सडेतोड उत्तर दिले. लाबुशेन ६१ चेंडूंत ७० धावा करून माघारी परतला. मॅक्सवेलनं २९ चेंडूंत नाबाद ६३ धावा केल्या. ऑस्टेलियानं ४ बाद ३८९ धावा चोपल्या.

भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) डुलक्या देत असल्याचा फोटो व्हायरल झाला. तो फोटो आजच्याच सामन्याचा आहे की नाही, हे स्पष्ट नसले तरी सोशल मीडियावर शास्त्री ट्रोल होत आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवी शास्त्रीविराट कोहली