India vs Australia : धोनीने रांचीमध्ये येऊन नेमकं काय केलं, पाहा फक्त एका व्हिडीओमध्ये

आपल्या शहरात आल्यावर धोनीने नेमके काय काय केले, ते फक्त एकाच व्हिडीओमध्ये पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 08:58 PM2019-03-07T20:58:42+5:302019-03-07T20:59:05+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: What did ms Dhoni in Ranchi... see only in one video? | India vs Australia : धोनीने रांचीमध्ये येऊन नेमकं काय केलं, पाहा फक्त एका व्हिडीओमध्ये

India vs Australia : धोनीने रांचीमध्ये येऊन नेमकं काय केलं, पाहा फक्त एका व्हिडीओमध्ये

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तिसऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ रांचीमध्ये रवाना झाला आहे. रांची हे धोनीचे होम टाऊन. आपल्या शहरात आल्यावर धोनीने नेमके काय काय केले, ते फक्त एकाच व्हिडीओमध्ये पाहा...


जेव्हा धोनीचे रांचीमध्ये आगमन होते तेव्हा
 भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. आता तिसरा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. रांचीला ओळख मिळवून दिली ती महेंद्रसिंग धोनीने. कारण या लहान शहरातून आलेला तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाला. 

भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ रांचीच्या विमानतळावर दाखल झाला होता. ते काही काळ विमानतळावर गाड्यांची वाट पाहत होते. भारतीय संघातून पहिला विमानतळावरून बाहेर पडला तो रिषभ पंत. पण पंतनंतर बाहेर पडला तो रांचीचा लाडका सुपूत्र धोनी. विमानतळावर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

 धोनी आपल्या हमर कारमधून केदार आणि पंतबरोबर ड्राइव्हवर जातो तेव्हा...
भारताचा तिसरा एकदिवसीय सामना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीमध्ये होणार आहे. भारतीय संघाचे बुधवारी रांचीमध्ये आगमन झाले. त्यावेळी इथल्या सुपूत्राने आपली हमर गाडी आणली होती. या हमर गाडीतून धोनीने केदार जाधव आणि रिषभ पंत यांना सफर घडवल्याचे पाहायला मिळाले आहे.

धोनीने टीम इंडियाला दिली 'लिट्टी-चोखा' पार्टी, फार्महाऊसवर झाले धुमशान
रांची या छोट्याश्या शहराला ओळख मिळवून दिली ती भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने. भारताचा तिसरा सामना रांचीला होणार आहे. रांचीला आल्यापासून धोनी एकदम मस्तीमध्ये वावरत असल्याचे दिसत आहे. कारण हमर गाडीतून धोनीने केदार जाधव आणि रिषभ पंत यांना सफर घडवल्याचे पाहायला मिळाले. आता तर धोनीने टीम इंडियाला  'लिट्टी-चोखा' पार्टी दिल्याचेही समोर आले आहे.

बुधवारी रात्री धोनीने आपल्या सात एकराच्या फार्म हाऊसमध्ये टीम इंडियाला पार्टीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी पार्टीमध्ये खास पदार्थ होता तो 'लिट्टी-चोखा'. उत्तर प्रदेश, झारखंड या भागांमध्ये 'लिट्टी-चोखा'हा पदार्थ प्रसिद्ध आहे. त्यामुळे धोनीनेही या पार्टीमध्ये 'लिट्टी-चोखा' हा पदार्थ ठेवला होता.

Web Title: India vs Australia: What did ms Dhoni in Ranchi... see only in one video?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.