ठळक मुद्देभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-20 सामना बुधवारीकांगारूंना जशास तसे उत्तर देण्यास कोहली सज्ज2016च्या मालिकेची पुनरावृत्ती करण्याचा मानस
ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी स्लेजिंग करणार नाही, असे सांगणाऱ्या विराट कोहलीने मंगळवारी कांगारूंना इशारा दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा पहिला सामना बुधवारी गॅबा येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने यजमान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सज्जड दम भरला. त्यानंतर कोहलीने नेटमध्ये तुफान फटकेबाजीही केली.
''स्लेजिंग करण्याचे खेळाडूंच्या ध्यानी मनीही नाही. ही चर्चा रंगवली जात आहे आणि आम्हाला त्यापासून दूर राहायचे आहे. पण, प्रतिस्पर्धींनी आक्रमकता दाखवली, तर तुम्हालाही प्रतीहल्ला करावाच लागेल. आम्ही संयमतेची सीमा आखली आहे आणि ती ओलांडण्याचा प्रयत्न झाला, तर आमच्याकडूनही उत्तर मिळेल,'' असे मत कोहलीने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने मात्र शाब्दिक वाद होणार नसल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला,''
विराट कोहलीला आक्रमकता आवडत असली तरी आम्ही ती खेळापूरतीच मर्यादित ठेवणार आहोत. शाब्दिक बाचाबाची नसेल.''